ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असा निर्णय घेणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - कृषी संजीवनी मोहिम

शेतकरी राजा राज्याचे वैभव आहेत. ते जपण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. (will not take any decision that harm to farmers assures cm uddhav thackeray)

CM Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

author img

By

Published : Jul 1, 2021, 6:18 PM IST

Updated : Jul 1, 2021, 6:51 PM IST

मुंबई : शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राज्यात कृषी सुधारणा विधेयक आणण्याच्या हालचाली सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे हे येथे उल्लेखनीय. शासन म्हणून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.(will not take any decision that harm to farmers assures cm uddhav thackeray)

शेतकरी राज्याचे वैभव
शेतकरी राजा राज्याचे वैभव आहेत. ते जपण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यात दुष्काळ, पूर, गारपीट, कोरोना असे संकट येते. नैसर्गिक आपत्तीमुळे सोन्यासारखे पिक डोळ्यासमोर मातीमोल होते. अशा संकटांचा शेतकरी धैर्याने सामना करतो. हे काम येरा-गबाळ्याचे नाही. अशावेळी शेतकऱ्यांना मदत केली नाही तर सरकारचा काहीही उपयोग नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी कर्जमुक्तीने कामकाजाची सुरुवात
शेतकरी कर्जमुक्ती, पीक विम्यासाठी युतीच्या काळात आंदोलने केली. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन कामांची सुरुवात केली. कोरोनाच्या संकटाला दीड वर्षांपासून राज्य तोंड देत आहे. मात्र या काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेचा भार शेतकऱ्यांनी पेलला आहे. शेतकऱ्यांचे आपल्यावर उपकार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांप्रमाणे शेतीतही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जोन्नती केली पाहिजे. राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल या योजनेनुसार जे पिकवले ते विकले गेले पाहिजे. त्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता जपावी
भारत कृषी प्रधान देश आहे. हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईकांची परंपरा आपल्याला लाभली आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी धाडस करायला हवे. सध्या शेतकरी अडचणीत आहे, याची मला जाणीव आहे. मात्र, राज्यातील शेतकरी हिताला धक्का लागेल, अशी एकही बा‍ब राज्यात होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता जपली पाहिजे. मर्यादीत स्वरुपात प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम राज्य सरकार करेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना - उपमुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आणि अनुभवाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास त्याचा नक्की फायदा होईल. कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून त्याला सुरुवात झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यात कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान या त्रिसूत्रीचा वापर करीत कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे ते म्हणाले.

प्रयोगशील शेतकरी हे स्वतंत्र विद्यापीठ - महसूल मंत्री
प्रयोगशील शेतकरी हे स्वतंत्र विद्यापीठ असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. उत्पादकता वाढल्यास शेती परवडणारी होऊ शकते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणारे कृषीमंत्री दादाजी भुसे मनापासून काम करीत असल्याचे गौरवोद्गार मंत्री थोरात यांनी यावेळी काढले. पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचे अनुभव शब्दबद्ध आणि चित्रीत करुन ते राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

मोहिमेत 7 लाख शेतकऱ्यांचा सहभाग - कृषीमंत्री
राज्यात दरवर्षी कृषी संजीवनी मोहिम कृषी दिनापासून राबविली केली जाते. कृषी दिनापासून आठवडाभर ही मोहिम राबवून खरिपासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. शेकडो शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. या मोहिमेत 7 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या काळात प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यात कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी विविध योजना एकाच छताखाली आणून प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याकरीता अन्न प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती, कृषीमाल विक्री व्यवस्था बळकट करणे, बियाण्यांबाबत महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देणे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी अन्न देवता असल्याचा उल्लेख कृषीमंत्र्यांनी यावेळी केला.

हे उपस्थित होते
मान्यवरांच्या हस्ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रब्बी हंगाम 2020 मधील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. साहेबराव चिकणे(सातारा), सुहास बर्वे(सिन्नर), वसंत कचरे(खटाव), राजेश हाळदे(देगलुर), आट्या पाडवी(तळोजा), विठ्ठल आवारी(इगतपुरी), हिराचंद गावित(कळवण) या विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याची भेट मुख्यमंत्र्यांनी देण्यात आली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, पोक्रा प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी, कृषी संचालक विकास पाटील यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थिती समारोप

कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा आज समारोप झाला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री बोलत होते. नाशिक येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे शासकीय सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित होते. कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी कृषी दिनानिमित्त यावेळी शुभेच्छा देताना राष्ट्रीय डॉक्टर दिनाचाही उल्लेख करत कोरोना काळात शेतकरी आणि डॉक्टर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच हे दोन्ही अन्नदाते आणि जीवनदाते असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

हेही वाचा - राज्याचा कृषी सुधारणा कायदा पावसाळी अधिवेशनात मंजुर होण्याबद्दल शरद पवार साशंक

Last Updated : Jul 1, 2021, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.