मुबंई - आज महाविकासआघाडीमधील मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री अनिल परब यांनी विलेपार्ले येथील एका लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले होते. यावेळी त्यांच्या नावाचे आणि पक्षाचे होर्डींग्स लसीकरण केंद्राबाहेर आले. या प्रकरणावरून भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे यांनी प्रश्न पालिका आयुक्तांना प्रश्न विचारला आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांबरोबरच शासकीय तसेच खासगी किंवा औद्योगिक लसीकरण केंद्राबाहेरही राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती, भींतीचित्रे लावण्यास पालिका प्रशासनाने मनाई केली असताना पालिका आयुक्त मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री अनिल परब यांनी यांच्यावर कारवाई करतील का, असे त्यांनी म्हटले आहे.
'पालिका आयुक्त शिवसेनेवर कारवाई करणार का' -
दरम्यान, महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोणत्याही पक्षाने जाहिरात करणारी किंवा श्रेय घेणारी फलकबाजी लावू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी ३ जून रोजी काढले होते. मात्र, गेल्या १० दिवसांत त्यात काही फरक पडला नाही. आज विलेपार्ले येथील कोरोना लसीकरण केंद्राच्या बाहेर शिवसेनेने बॅनरबाजी केल्यामुळे भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेवरती कडाडून टीका केली. सत्तेतील पक्षाला कोणते नियम लागू होत आहेत की नाही? मुंबई आयुक्तांनी आदेश काढले आहेत त्यांचे पालन जर शिवसेना करत नसेल तर मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याचे उत्तर द्यावे, त्यांनी शिवसेनेवर कारवाई करण्याची हिंम्मत दाखवावी, अशा शब्दात त्यांनी शिवसेना आणि महापालिका आयुक्त यांना खडेबोल सुनावले आहे.
हेही वाचा - VIDEO : सांगलीत नदीकाठी १३ फुटी अजस्त्र मगरीचे दर्शन.. कृष्णाकाठ भयभीत