ETV Bharat / city

Shinde-Fadnavis Ministry Expansion : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार 'या' तारखेनंतर होणार - bjp

शिंदे फडणवीस ( Shinde Fadnavis ) मंत्रिमंडळाचा विस्तार ( Ministry Expansion ) कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार सध्या अडून राहिला आहे. राज्यातील पाऊस परिस्थिती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच विस्तार करण्याचा विचार शिंदे फडणवीस यांनी केला आहे.

Shinde Fadnavis
शिंदे-फडणवीस
author img

By

Published : Jul 6, 2022, 3:45 PM IST

Updated : Jul 6, 2022, 4:03 PM IST

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena rebel leader Eknath Shinde ) आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ( BJP leader Devendra Fadnavis ) यांनी सरकार स्थापन करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आणि सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक ठराव ही जिंकला. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. मात्र सध्या तरी मंत्रिमंडळाचा विस्तार काही काळासाठी अडवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला पुढील आठवड्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

का अडला आहे मंत्रिमंडळाचा विस्तार ? - राज्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी होत ( High Alert Of Rain ) असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार करणे योग्य नाही. अशी भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे. त्याशिवाय येत्या 11 जुलैला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असली तरी मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही कायदेशीर अडचण नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून तातडीने अंतरिम आदेश दिला जाईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे यावर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच 11 तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

काय होऊ शकते न्यायालयात ? - येत्या अकरा तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान अपात्र आमदारांविषयीच्या याचिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षांची निवड झाली असल्याने या संदर्भातली सुनावणी विधानसभा अध्यक्ष करतील असा निर्णयही न्यायालय देण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना नक्की कुणाची? मूळ गट की शिंदे यांचा नवीन गट? याबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे. अंतिम सुनावणीत हे मुद्दे निकाली निघणार असून शिंदे गटाविरोधात अंतरिम आदेश जाण्याची शक्यता कमी असली तरीही शिंदे फडणवीस यांच्याकडून सावधगिरी बाळगली जात आहे.

कसे असेल मंत्री पदाचे सूत्र ? - मंत्रिमंडळात चार आमदारांमागे एक मंत्री असे सूत्र ठरल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, शिंदे गटाला ( Shinde Group ) तेरा ते चौदा मंत्री पदे मिळण्याची शक्यता ( likely to get fourteen ministerial posts ) आहे. आणि भाजपाच्या (bjp) वाट्याला 28 मंत्रिपदे जातील अशी शक्यता आहे. गृहमंत्री पद, महसूल मंत्री पद, अर्थमंत्री, नगर विकास, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांबाबत दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. याबाबत, अद्याप निर्णय न झाल्याने ही मंत्रिमंडळाचा विस्तार टाळण्यात आला आहे.

बहुमत चाचणीची लढाई जिंकली - सोमवारी 4 जुलैला विधानसभेत झालेल्या निवडणूकीत शिंदे - फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकील. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध केले. आवाजी मतदानाने बहुमत चाचणी पार पडली. एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे तीन आमदार तटस्थ राहिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला.

हेही वाचा - CM Shinde meet Sharad Pawar : आघाडीला सुरुंग लावणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Last Updated : Jul 6, 2022, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.