मुंबई - आयकर विभागाच्या छापेमारीवर शरद पवार आणि अजित पवार बोलणे सोयीस्कर विसरतात आणि बाकीच्या गोष्टींवर स्पष्टता देतात. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक हे पवार कुटुंबातील आहेत. मग या विषयावर शरद पवार गप्प का आहेत? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी विचारला आहे.
हेही वाचा - प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जरंडेश्वरबाबत शरद पवार गप्प का?
अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने 12 स्थळ उभे करून घेतली. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक या अजित पवारांच्या दोन्ही बहिणी आहेत. दोन्ही बहिणींच्या कंपन्या जरंडेश्वर साखर कारखाना चालवतात. या विषयावर शरद पवार का शांत आहेत? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने जरंडेश्वर साखर कारखान्यासह इतर ठिकाणीही छापे टाकले होते. अनेक साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारांची चौकशी सध्या सुरू आहे. या कारखान्याच्या व्यवस्थापनात अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. असल्याचे सोमैया यांनी सांगितले.
हेही वाचा - कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत