ETV Bharat / city

Andheri Assembly Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत कोण फडकवणार भगवा? शिवसेना विरुद्ध भाजपचा रणसंग्राम

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक ( Andheri Assembly Constituency ) येत्या तीन नोव्हेबरला होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप ( Shiv Sena vs BJP ) अशी थेट लढत असली तरी शिवसेनेतील फुटीर शिंदे गटाची भाजपा उमेदवाराला मदत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघ ( Andheri Assembly Constituency ) दिवंगत आमदार रमेश लटके ( Late Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनामुळे घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत ( Andheri Assembly Election ) शिवसेना चुरशीने लढणार आहे.

Andheri Assembly Constituency
अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक
author img

By

Published : Oct 10, 2022, 5:04 PM IST

मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक ( Andheri Assembly Constituency ) येत्या तीन नोव्हेबरला होणार आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके ( Late Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर होणारी निवडणूक ( Andheri Election ) अत्यंत चुरशीची असणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप ( Shiv Sena vs BJP ) अशी थेट लढत असली तरी शिवसेनेतील फुटीर शिंदे गटाची भाजपा उमेदवाराला मदत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघ ( Andheri Assembly Constituency ) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत ( Andheri Assembly Election ) शिवसेना चुरशीने लढणार आहे. मोठमोठ्या सभा घेण्याऐवजी प्रत्यक्ष मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर शिवसेनेचा भर ( Shiv Sena contact voters directly ) असणार आहे. रमेश लटके यांचे मतदारसंघातील काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रणनीती आखल्याचे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांनी सांगितले.

Andheri Assembly Constituency
एकुण मतदारांची संख्या

सेना विरुद्ध भाजप सामना - दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे.(Andheri by poll election). शिवसेनेची या मतदार संघावर मजबूत पकड आहे. आता होणाऱ्या पोट निवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र या निवडणूकीत शिवसेनेचे पारडे जड असून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेला ( Rituja Latke ) मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. ( shiv sena favorite in andheri by poll election ).

सर्वसमावेशक मतदारसंघ - अंधेरी पूर्वेकडील साकीनाका ते महाकाली गुंफा परिसर, अंधेरी एमआयडीसी, वीर नेताजी पालकर चौक, गुंदवली, एसिक रुग्णालय, भवानी नगर, विजय नगर, लार्सन अँड टुब्रो पॉवर कॉम्प्लेक्स, पवईचा काही भाग, अंधेरी-कुर्ला रोड, पश्चिम द्रुतगती महामार्गालगतचा भाग या मतदारसंघात येतो. कोकणातील मंडळी या भागात मोठ्या संख्येने राहतात. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग याशिवाय सामाजिक व आर्थिक कारणांमुळे झोपडपट्टीत राहणारा वर्गही या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. एका अर्थाने कॉस्मोपोलिटन चेहरा असलेल्या या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि देशभरातील विविध प्रांतातून आलेली मंडळी गुण्यागोविंदाने राहत आहेत. काँग्रेसचा परंपरागत मतदार या भागात असला तरी मुंबईच्या राजकारणाचा बदलत्या काळात या भागात सत्ताधारी शिवसेना रुजली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला - एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व या मतदार संघात होते. मात्र, आता काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शिवसेनेने विकासकामांच्या जोरावर गेल्या दहा वर्षांपासून येथे पाय रोवले आहेत. भाजपा कॉंग्रेसमधून आलेल्या मुरजी पटेल यांच्या माध्यमातून मतदार संघावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील विधानसभा निवडणूकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर येत्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल पुन्हा नशीब आजमवणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होती. आता मतांचे विभाजन होणार आहे. परंतु, हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेचा लाभ ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांना होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाची गोची - एखाद्या मतदारसंघातील आमदाराचे निधन झाल्यास रिक्त झालेल्य़ा जागेवर त्यांच्या कुटूंबियांपैकी कोणी उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची नाही, असा महाविकास आघाडीचा अलिखित नियम आहे. त्यामुळे शिंदे जर शिवसेना म्हणून सांगत असतील तर, ते या नियमाच्याविरोधात वागतील का, जर त्यांनी स्वतः उमेदवार दिला नाही, भाजपच्या उमेदवाराला मदत केली तरीही तै नैतिकदृष्ट्या त्यांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाची या निवडणूकीत नैतिक गोची झाली आहे.

भाजपला शिंदे गटाचे पाठबळ - शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन स्थानिक मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय रमेश लटके यांचे मतदार संघातील कार्य सहाय्यभूत ठरेल असे शिवसेनेला वाटतं. तर मुरजी पटेल या भाजपच्या बंडखोर उमेदवाराला यावेळी भाजप अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे. पटेल यांनी गेल्या निवडणुकीत लटके यांना चांगली टक्कर दिली होती. त्यातच आता शिंदे गटाचे पाठबळ आणि भाजपच्या अधिकच्या ताकदीच्या बळावर ही जागा जिंकून आणता येईल असा विश्वास भाजपचे प्रवक्ते अजय सिंह यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेस,राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा - कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा ( Congress, NCP support Shiv Senab ) राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग गेली अडीच वर्षे चालला. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) कोसळले. सध्या शिंदे गट, भाजपचे सरकार सत्तेत आहेत. आगामी निवडणुका देखील शिंदे गट, भाजप युतीत लढणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या अंधेरीच्या पोट निवडणुकीत शिवसेनेला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मनसेची भूमिका गुलदस्त्यात अंधेरी पूर्व मतदार संघात मनसे प्रमुख राज ठाकरेंना ( MNS chief Raj Thackeray ) मानणारा वर्ग आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेने स्वतंत्र लढेल, असे संकेत दिले आहेत. वरळी विधानसभा मतदार संघ वगळता, मनसे आजवर शिवसेनेविरोधात उमेदवार देण्याची भूमिका कायम राखली​​ आहे. शिवसेनेतील दोन गटानंतर राजठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेत आहेत. आगामी पोट निवडणुकीत मनसेची भूमिका गुलदस्त्यात आहे.

शिवसेना घरोघरी जाणार - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी फिरण्याची शिवसेनेला गरज नाही. या मतदारसंघात मोठ मोठ्या सभा घेण्यापेक्षा रोजच्या संपर्कातील लोकांना प्रत्यक्ष भेटणार आहोत. दिवंगत रमेश लटके यांनी केलेल्या कार्याच्या आधारावरच मते मागणार असल्याने लोकांशी थेट घरोघरी जाऊन संपर्क साधणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. या मतदारसंघात बहुभाषिक मतदार असले तरी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेलाच मते मिळतील तर स्थानिक कार्याच्या जोरावर बहुभाषीक मतदार लटके यांनाच पसंती देतील, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. या शिवाय या निवडणूकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची या मतदारसंघातील बळाचाही आम्हाला फायदा होणार आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसने २७ हजार मते घतेली होती हे विसरूनही चालणार नाही, असेही परब म्हणाले.

चिन्हा शिवाय लढण्याचाही पर्याय - शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच सुनावणी होणार आहे. या सुनावणी चिन्ह शिवसेनेसोबतच राहील असा विश्वास शिवसेनेला वाटतो होता. मात्र, शिवसेनेचे चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. त्यामुळे शिवसेना उगवता सूर्य. मशाल, तलवार अथवा गदा यापैकी एक चिन्ह घेऊन लढण्याचा पर्याय शिवसेनेने ठेवला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मतदार संघाची मतदार संख्या, भाषिक रचना? या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 2 लाख 71 हजार 668 इतकी आहे. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 46 हजार 780 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 24 हजार 887 इतकी आहे. एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश या मतदारसंघात होतो. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक मतदारांचे (North Indian and Marathi speaking voters) समसमान प्रमाण आहे. त्या पाठोपाठ मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाचे लोक या मतदारसंघात आढळतात.

काय आहेत मतदारसंघातील अडचणी ? प्रभागानूसार पाहायचे झाल्यास वॉर्ड क्रमांक ८० मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची (एसआरए) (Slum Rehabilitation Scheme) मोठी समस्या आहे. येथील रहिवासी दहा-बारा वर्षे घरापासून वंचित आहेत. वॉर्ड क्रमांक १२१, ७६, ८१ मध्ये रस्त्यांची खूप दुर्दशा झालेली आहे. वॉर्ड क्रमांक ७५ म्हणजे कृष्ण नगरमधील मोठा नाला साफ होत नसल्यामुळे तेथील सर्व नाले पावसाळ्यात तुडुंब भारतात. परिणामी या नाल्याचे पाणी बाहेर आल्याने मरोळ परिसर जलमय होतो. त्याचबरोबर कदमवाडीतील रोड रुंदीकरण विकास योजना दहा वर्षांपूर्वीच मंजूर होऊन अद्याप त्यासंदर्भात पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तिथून एकावेळी एकच गाडी ये-जा करू शकते आणि त्यामुळे प्रचंड वाहतुककोंडी होत असते.वाहतुकीची मोठी कोंडी, दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सेवासुविधांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसाळ्यात सखल भागात तुंबणारे पाणी, आरोग्याचा प्रश्न, सांडपाण्याचा निचरा या प्रमुख नागरी समस्या स्थानिकांना भेडसावतात.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ:एकूण मतदारसंख्या - २,७३,५०९

पुरुष मतदार - १,४८,३२६

महिला मतदार - १,२५,१७८

तृतीयपंथी मतदार - ०५

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.