मुंबई - सध्या राज्यात ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. वेळोवेळी सरकारवर विरोधी पक्ष ड्रग्ज तस्करांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. भारतीय जनता पार्टी देशात अमली पदार्थांचे सेवन आणि वाटप करणाऱ्या धंद्याविरोधात संघर्ष करून संपूर्ण देशाला आणि युवा पिढीला वाचविण्याच्या दृष्टीने काम करत आहे. मात्र राज्यात ड्रग्ज तस्करांना वाचवतोय कोण? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, की गेले काही दिवस बॉलिवूडमध्ये ड्रग कनेक्शन याविषयी चर्चेला उधाण येत आहे. ड्रग्ज माफियांमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीवर आघात होतोय अशी चर्चा आहे. संसदेमध्ये देखील हा विषय चर्चेला आला होता. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. अमली पदार्थांचे सेवन, वाटप आणि कार्यक्रम करणाऱ्या लोकांच्या बरोबर कोण आहे आणि विरोधात कोण आहे हे देश पाहू इच्छितो. अमली पदार्थांच्या विरोधात भाजपा असून युवकांना वाचवण्याचे काम करत आहे. परंतु काहीजण केवळ राजकीय हेतूसाठी अमली पदार्थ सेवन आणि त्यांच्या बाजूने उभे राहत असतील तर त्यांचा आम्ही धिक्कार करतो, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
ड्रग्ज तस्करांना राज्यात वाचवतोय कोण? आशिष शेलारांचा सरकारला सवाल - ड्रग्ज तस्करीबाबत शेलारांचा सरकारला सवाल
भारतीय जनता पार्टी देशात अमली पदार्थांविरुद्ध कडक कायदे करून देश व युवा पिढीला वाचवण्याचे काम करत आहे. परंतु काहीजण केवळ राजकीय फायद्यासाठी ड्रग्ज तस्करांच्या बाजुने उभे राहत असतील तर आम्ही त्यांच्या धिक्कार करतो, असा अप्रत्यक्ष टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला हाणला.