मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी कथितरित्या राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप होऊ लागल्याने या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री या प्रकरणी कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती -
पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात कथितरित्या राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव समोर आल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. दरम्यान, याबाबत राज्य सरकारकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणी कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती.
फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी-
या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी -
परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी कथितरित्या राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा होत असताना भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव जाहीर करत कारवाईची मागणी केली. तसेच राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी मौन बाळगले आहे. या प्रकरणासंदर्भातली माहिती घेऊन नंतर त्यावर प्रतिक्रिया देईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते आज चिपळूण दौऱ्यावर आले होते.
यासंबंधीच्या सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : विरोधक आक्रमक, तर सत्ताधारी म्हणतात मंत्र्याचे नाव जोडणे चुकीचे
पूजा चव्हाणसाठी समाजाने रस्त्यावर उतरावे, प्रकरणात बड्या मंत्र्याचे नाव
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ
पुजा चव्हाणला न्याय न मिळाल्यास बंजारा समाजाचा आंदोलनाचा इशारा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली माहिती
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा- फडणवीस