मुंबई - उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या पक्ष चिन्हांच्या मागणीत उगवता सूर्य आणि त्रिशूल या चिन्हांचा समावेश होता. त्यापाठोपाठ शिंदे गटाने उगवता सूर्य आणि आणि त्रिशूल चिन्हाची मागणी केली आहे. या संदर्भात विचारले असता शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी केव्हाच हिंदुत्व सोडल आहे. (Electoral symbol) काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणाऱ्या ठाकरे गटाला हिंदुत्वाची आणि हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या चिन्हांची गरज काय? हिंदुत्वाचे प्रसिद्ध असलेली ही दोन चिन्हे वापरण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. आम्ही हिंदुत्वाचे राखणदार आहोत. हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे ही चिन्हे आम्हीच वापरणे योग्य आहे, त्यासाठीच आम्ही त्या चिन्हांची मागणी केली आहे. आता शेवटी निवडणूक आयोग काय निर्णय देते त्यावर सर्व अवलंबून आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीचा अद्याप निर्णय नाही - अंधेरी पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? भाजपसोबत युती करणार का या संदर्भात विचारले असता केसरकर म्हणाली की, आम्ही भाजप सोबत आहोत भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपद दिले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती करणार हे स्पष्ट आहे. मात्र, अद्याप कोणताही युतीचा निर्णय झालेला नाही. युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे अध्यक्ष एकत्र बसून घेतील. मात्र, आम्ही अद्याप उमेदवार देणार की नाही याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. कारण आमच्याकडे चिन्ह नाही चिन्ह मिळाल्यानंतर आपला उमेदवार द्यायचा आहे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दिशाभूल करू नका - शिवसेनेचे धनुष्यबाण ही चिन्ह 40 आमदारांच्यामुळे गोठवले गेले आहे अशा पद्धतीची दिशाभूल जनमानसांमध्ये करू नये. चिन्ह आमच्यामुळे नाही तर उद्धव ठाकरे यांच्यामुळेच गोठवले गेले आहे. उद्धव ठाकरे यांनी जर 40 आमदारांचे ऐकून भाजप सोबत युती केली असती, तर ही वेळ आली नसती असेही हे केसरकर यावेळी म्हणाले आहेत.