ETV Bharat / city

West Bengal Chief Minister Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

author img

By

Published : Feb 2, 2022, 3:19 PM IST

Updated : Feb 2, 2022, 5:40 PM IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रगीताचा अपमान प्रकरणी शिवडी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात ( Shivadi Court ) आले आहेत. ममता बॅनर्जी यांना 2 मार्च, 2022 रोजी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी तक्रार केली होती. याचिका दाखल करण्यात आली होती.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee) विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालय म्हणजेच शिवडी न्यायालयात ( Shivadi Court ) याचिका दाखल केली ( Petition Against Mamata Banerjee ) होती. या याचिकेवर बुधवारी (दि. 2 फेब्रुवारी) सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्च, 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माहिती देताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी

मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा रोजी अपमान आणि अनादर केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्र गीताचा अपमान केल्या प्रकरणी न्यायालयासमोर भा.दं.वि.चे कलम 156 ( 3 ) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्या संदर्भात आदेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी 2 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

  • Metropolitan Magistrate Court,Mumbai directs WB CM Mamata Banerjee to appear before them on March 2 in connection with a complaint against her for allegedly insulting national anthem during her visit to Mumbai last year. The complaint was lodged by a Mumbai BJP leader

    (File pic) pic.twitter.com/qT9ze2hDZO

    — ANI (@ANI) February 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ममता बॅनर्जी या 1 डिसेंबर, 2021 रोजी मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात खुर्चीवर बसलेल्या असतानाच, राष्ट्रगीताला सुरुवात केली. चार-पाच ओळी गायल्यानंतर त्या थांबल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. ममता बॅनर्जी यांनी खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यानंतर त्या जागेवरून उठल्या. त्या चार ते पाच ओळी गायल्यानंतर उभे राहिल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा, राष्ट्रगीताचा व संपूर्ण देशाचाही अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - BDD Chawl Worli Redevelopment : ना.म. जोशी मार्गावरील बीडीडीवरही आठ तारखेला पडणार हातोडा, मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

Last Updated : Feb 2, 2022, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.