ETV Bharat / city

लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल - मुंबईत अभिनेत्रीचे लैंगिक शोषण

चित्रपटसृष्टीत वेबसीरिज आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीसोबत ओळख झाली होती. आयुष तिवारी याने पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सतत दोन वर्ष शरीरसंबंध ठेवले होते. पीडितेने आयुष तिवारी याच्याकडे लग्नाची मागणी केली असता आयुष याने त्या अभिनेत्रीला टाळण्यास सुरुवात केली.

mumbai
प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 30, 2020, 1:11 PM IST

मुंबई - लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर तब्बल दोन वर्ष बलात्कार करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर विरोधात मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष तिवारी असे कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे.

अभिनेत्रीच्या प्रेमाचा गैरफायदा -
चित्रपटसृष्टीत वेबसीरिज आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीसोबत ओळख झाली होती. तब्बल दोन वर्षे एकमेकांच्या संपर्कात राहिल्यामुळे या दोघांमध्ये प्रेम जुळले होते. त्यानंतर आयुष तिवारी याने पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सतत दोन वर्ष शरीरसंबंध ठेवले होते. शरीर संबंध ठेवल्यानंतर पीडित अभिनेत्री ही गर्भवती राहिली. पीडितेने आयुष तिवारी याच्याकडे लग्नासाठी मागणी केली असता आयुष याने पीडित अभिनेत्रीला टाळण्यास सुरुवात केली.

संपर्क तोडल्याने पीडितेने पोलिसांत केली तक्रार -
नेहमी संपर्कात राहणाऱ्या आयुषला लग्नाविषयी विचारल्यानंतर त्याने पीडितेशी संपर्क तोडला. त्यामुळे पीडित अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यासंदर्भात कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आयुष तिवारी याची चौकशी करीत असून लवकर पुढील कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा -इंस्टाग्रामची मैत्री पडली महागात.. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुंबईच्या तरुणीला लाखोंना लुटले

हेही वाचा -महिलांवर अत्याचार करून, पॉर्नसाइटवर व्हिडीओ टाकणाऱ्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.