ETV Bharat / city

चंद्रकांतदादांना बाबासाहेब पुरेंदरेंचं शिवचरित्रं पाठवू - संजय राऊत - we will sent him a shivcharitra

बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवछत्रपतींचे खंड महाराष्ट्रात आहे. कोथळा काढणे नेमकं काय ? याबद्दल आपण चर्चा करू. आम्ही इतिहास वाचला आहे आणि इतिहास समजतो. पण आम्ही इतिहास चिवडत बसत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Sep 6, 2021, 3:16 PM IST

मुंबई - आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर कोथळा बाहेर काढतो असे भाष्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. यावरून आता राजकारण तापले आहे. यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की, भाजप माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत. पण मी कुणाचा कोथळा काढायची भाषा केली हे सांगायला पाहिजे ना?, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांना बाबासाहेब पुरंदेरंचं शिवचरित्रं पाठवून देऊ. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे काय? हे समजून घ्यावं, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

पाठीत खंजीर ते खुपसत होते, असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. यावर मी उत्तर दिलं आहे. आम्ही त्यांना शिवचरित्र पाठवू. यांनी शिवचरित्र वाचलं पाहिजे. बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवछत्रपतींचे खंड महाराष्ट्रात आहे. कोथळा काढणे नेमकं काय ? याबद्दल आपण चर्चा करू. आम्ही इतिहास वाचला आहे आणि इतिहास समजतो. पण आम्ही इतिहास चिवडत बसत नाही, असे राऊत म्हणाले.

पुन्हा एकदा भगवा फडकणार
बेळगावमध्ये मराठी लोक एकत्र झालेले आहेत. जो भगवा फडकला होता पुन्हा एकदा फडकणार आहे. बेळगावमध्ये सध्याचे वातावरण पाहता महाराष्ट्र एकीकरण समिती व त्यांचे मित्र असे मिळून भगवा फडकवतील. कर्नाटकने महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळू नये म्हणून प्रयत्न केले. बेळगावची जनता लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आपले मत व्यक्त करेल. आणि ते मत महाराष्ट्र संदर्भात असेल असेही राऊत यांनी सांगितले.

वेट अँड वॉच करणं महत्त्वाचे
अनिल देशमुखला पहिल्यांदा नोटीस आली नाही. लूक आऊट नोटीसही अनेकदा याच्या आधी बजावली. या कायद्याची लढाई सध्याची सुरू आहे त्यात वेट अँड वॉच करणं महत्त्वाचे आहे.

भाजपचे महाराष्ट्रामध्ये बहुमत नाही
आम्ही तीन पक्ष आहोत पण आमचा बहुमत तर आहे. तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारणात दुसरा कोणी केलं होतं ते खंजीर खुपसणे आहे. मध्यप्रदेशमध्ये माधवराव शिंदे यांच्या सुपुत्रांना फोन लावते. राजकारण कोणी केल्यास खंजीर खुपसणे म्हणतात. राजकारण गेल्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीचे सुरू आहे. हे पारदर्शक राजकारण नाही. जो तो आपला पक्ष आपला गट यासाठी राजकारण करत असतो. सध्या तरी जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे. सध्या आम्ही सत्तेत आहोत आणि पुढील तीन वर्ष आम्ही सत्तेत राहणार आहोत. पुढील निवडणुकामंध्ये विरोधी बाकावर बसावे लागेल आणि ते जनता ठरवेल असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा - 1 नोव्हेंबरपासून 43 स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, तुमचा फोन कोणता?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.