ETV Bharat / city

Maha Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरणार - आशिष शेलार - उद्धव ठाकरे

राज्यात होऊ घातलेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. दोन दिवसीय अधिवेशनात राज्य सरकारला आम्ही चांगलंच घेरणार आहोत. या अधिवेशनात मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न व शेतकऱ्याच्या मुद्यांवर आम्ही सरकारला सडेतोड प्रश्न विचारणार आहोत, असे शेलार यांनी म्हटले आहे.

पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरणार - आशिष शेलार

author img

By

Published : Jun 30, 2021, 7:13 PM IST

मुंबई : मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपचे नेते आशिष शेलार यांनी येत्या अधिवेशनात सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना सर्व प्रश्नांवरून आम्ही घेरणार आहोत असे शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

अधिवेशनात सरकारला घेरणार

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यानेही राजकारण चांगेलच तापले आहे. अशातच राज्यात होऊ घातलेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. दोन दिवसीय अधिवेशनात राज्य सरकारला आम्ही चांगलंच घेरणार आहोत. या अधिवेशनात मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न व शेतकऱ्याच्या मुद्यांवर आम्ही सरकारला सडेतोड प्रश्न विचारणार आहोत, असे शेलार यांनी म्हटले आहे.

अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी

राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी यापूर्वीच भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी करणारे निवेदन भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले होते. राज्यात बरेचसे प्रश्न प्रलंबित असतानाही यापेक्षा अजून छोट अधिवेशन करता येणं शक्य नाही म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे काय असा सवाल शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पावसाळी अधिवेशनात कृषी कायदा करणार असल्याची माहिती बुधवारी दिली.

हेही वाचा - भाजप-शिवसेना युतीबाबत कोणताही विचार आजतरी नाही - भाजप नेते आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.