ETV Bharat / city

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांतून अनेकांना रोजगार - सुभाष देसाई - desai

सुधीर तांबे यांनी राज्यातील बेरोजगारी आणि बंद पडत असलेल्या उद्योगांसंदर्भात अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याच्या उत्तरात देसाई यांनी ही माहिती दिली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई
author img

By

Published : Jun 29, 2019, 8:22 AM IST

मुंबई - राज्यात मागील काही वर्षांत उद्योग बंद झाले असले तरी मोठ्या प्रमाणात इतरही उद्योग आलेले आहेत. जे बंद झाले, त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही त्यांना सोयी सवलती देत आहोत. हे उद्योग वाढावेत म्हणून आम्ही काही सामूहिक योजनाही आणल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही राज्यात आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ८ रोजगार मेळावे घेतले. त्यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार मिळाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

सुधीर तांबे यांनी राज्यातील बेरोजगारी आणि बंद पडत असलेल्या उद्योगांच्या संदर्भात अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याच्या उत्तरात देसाई यांनी ही माहिती दिली. तांबे यांनी यावेळी सांगितले, की गेल्या ४५ वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे, यासाठी केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत ठरले. राज्यात ५० लाख लोकांचे रोजगार बंद गेले, यासंदर्भात कुठेतरी ठोस पावले उचलावीत. मेक इंडिया, स्टँडप इंडियाचे कोणतेही परिणाम दिसत नाहीत, पदवीधर लोक रोजगार हमीच्या कामावर जाताना दिसताहेत.

कौशल्य विकासाचे कार्यक्रम आणले. आज गावोगाव कौशल्य विकासाचे आऊट सोर्सिंग केले, परंतु त्याची फलनिष्पत्ती काय झाली, असा सवाल करत सरकारवर टीका केली. आऊट सोर्सिंग ऐवजी शैक्षणिक संस्थांना दिले असते तरी परिणाम चांगले आले असते. या कौशल्य विकासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी कृतीदल स्थापन करून ठोस पावले उचलावीत, सरकारी भरती कमी आहे, जी बेरोजगार मुले आहेत, त्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, रोजगार नसल्याने राज्यातील तरुण हा वैप्फल्यग्रस्त आहे, त्यामुळे बेरोजगारांना बेकार भत्ता सुरू करावा, जिल्हा उद्योग केंद्रे अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्न करावे आदी मागण्या तांबे यांनी केल्या.

Intro:बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगार- सुभाष देसाई Body:बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगार- सुभाष देसाई
मुंबई, ता. २८ : राज्यात मागील काही वर्षांत उद्योग बंद झाले असले तरी मोठ्या प्रमाणात इतरही उद्योग आलेले आहेत. जे बंद झाले, त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही त्यांना सोयी सवलती देत आहेत. हे उद्योग वाढावेत म्हणून आम्ही काही सामुहिक योजनाही आणल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही राज्यात आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आठ रोजगार मेळावे घेतले असून त्यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार मिळाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
सुधीर तांबे यांनी राज्यातील बेरोजगारी आणि बंद पडत असलेल्या उद्योगांच्या संदर्भात अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याच्या उत्तरात देसाई यांनी ही माहिती दिली. तांबे यांनी या वेळी सांगितले की, गेल्या ४५ वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे, यासाठी केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत ठरले. राज्यात ५० लाख लोकांचे रोजगार बंद झाले, या संदर्भात कुठेतरी ठोस पावले उचलावीत. मेक इंडिया, स्टँडप इंडियाचे कोणतेही परिणाम दिसत नाहीत, पदवीधर लोक रोजगार हमीच्या कामावर जाताना दिसताहेत. कौशल्य विकासाचे कार्यक्रम आणले. आज गावोगाव कौशल्य विकासाचे आऊट सोर्सिंग केले, परंतु त्याची फलनिष्पत्ती काय झाली, असा सवाल करत सरकारवर टीका केली. आऊट सोर्सिंग ऐवजी शैक्षणिक संस्थांना दिले असते तरी परिणाम चांगले आले असते. या कौशल्यविकास मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. यासाठी रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी कृतीदल स्थापन करून त्यासाठी ठोस पावले उचलावीत, सरकारी भरती कमी आहे, जी बेरोजगार मुलं आहेत, त्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावी, रोजगार नसल्याने राज्यातील तरुण हा वैप्फल्यग्रस्त आहे, त्यामुळे त्याला बेरोजगारांना बेकार भत्ता सुरू करावे, जिल्हा उद्योग केंद्रे अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्न करावे आदी मागण्या तांबे यांनी केल्या.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.