ETV Bharat / city

Maharashtra Water Storage : राज्यातील जलसाठा एका महिन्यात 20 टक्क्यांनी घटला, पाणीटंचाईचे संकट?

author img

By

Published : May 9, 2022, 3:17 PM IST

गेल्या संपूर्ण महिनाभरात राज्यात उन्हाच्या तीव्र झळांनी जनसामान्यांना हैराण केले असताना तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यातील जलसाठ्यावरही ( Maharashtra Dam Water Storage ) परिणाम झाला आहे. गेल्या २५ दिवसांत राज्यातील विविध धरणांमधील जलसाठा २० टक्क्यांनी ( Water Storage Decreased In Maharashtra ) कमी झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सचिवांनी दिली आहे.

Maharashtra Water Storage
Maharashtra Water Storage

मुंबई - गेल्या वेळी राज्यात पाऊस चांगला झाल्याने धरणातील पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील धरणांमध्ये 62% इतका ( Maharashtra Dam Water Storage Percentage ) पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, गेल्या संपूर्ण महिनाभरात उन्हाच्या तीव्र झळा आणि वाढलेल्या तापमानामुळे हा पाणीसाठा वेगाने ( Maharashtra Water Storage Decreased ) कमी झाला आहे. उन्हामुळे बाष्पीभवन होऊन गेल्या 25 दिवसात राज्यातील सर्व धरणातील मिळून सुमारे 20 टक्के पाणी आटले आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट दाटले आहे. राज्यातील 3 हजार 267 जलाशयांमध्ये 62% इतके पाणी उपलब्ध होते. ते आता 42.35 % इतके झाले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 42.84 % इतका होता. गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा पाणी कमी झाले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सचिवांनी दिली.

प्रकल्पातील पाण्याची स्थिती - राज्यातील 141 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 18266 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून हा 40.69 टक्के इतका आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा 43.51% इतका होता. तसेच राज्यातील 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 3305 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हा 48.59% इतका असून गतवर्षी हाच पाणीसाठा 52.36% इतका होता. तर राज्यात असलेल्या 2868 लघु प्रकल्पांमध्ये 3610 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून हा 44.59% इतका आहे. गतवर्षी हा खूपच कमी म्हणजे ७१.७४% इतका होता.

विभागनिहाय पाण्याची स्थिती? - अमरावती विभागातील 446 धरणांमध्ये 2898 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून तो 51.18% इतका आहे. तो गतवर्षी 47. 54% इतका होता. औरंगाबाद विभागातील 964 धरणांमध्ये 5773 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून तो 51.38% इतका आहे. गतवर्षी 43.88% इतका होता. कोकण विभागातील 176 धरणांमध्ये 868 दशलक्ष घनमीटर पाणी असून ते 48.67% इतके आहे. गतवर्षी 49 टक्के इतके होते. नागपूर विभागातील 384 धरणांमध्ये 2762 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून तो 38.97% इतका आहे. गतवर्षी 46.49% इतका होता. नागपूर विभागात सर्वाधिक पाणी कमी झाले आहे. नाशिक विभागातील 571 धरणांमध्ये 3381 दशलक्ष घनमीटर पाणी असून 41.95% इतका पाणीसाठा आहे. तो गतवर्षी 45.93% इतका होता. पुणे विभागात असलेल्या 726 धरणांमध्ये 8497 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून तो 35.32% इतका आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा 37 टक्के होता. एकूणच गेल्या 25 दिवसात राज्यातील पाणीसाठ्यात विक्रमी घट झाली असून 20 टक्क्याने पाणीसाठा कमी झाल्यामुळे आजमीतिला राज्यातील धरणांमध्ये केवळ 42.35% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यासमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले असून राज्य सरकार याबाबत उपाययोजना करीत असल्याची माहितीही जलसंपदा सचिवांनी दिली.

हेही वाचा - Mumbai NIA Raids Live Update : एनआयएची मुंबईत छापेमारी, छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुटला NIA ने घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.