मुंबई - मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आपल्या तुटपुंज्या पगारामुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. अशा लोकांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम करते म्हाडा. माडामुळे अनेकांना मुंबईत घर घेणे शक्य झाले. पण, आता म्हाडाच्या नवीन नियमांमुळे कदाचित तुम्हाला वेटिंगवर थांबावे लागण्याची शक्यता आहे (Waiting list starts again for MHADA houses). कारण, मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला म्हाडाच्या प्रतीक्षा यादीचा वाद आता म्हाडा प्राधिकरणाने निकालात काढला आहे.
प्रतीक्षा यादी बंद म्हाडात अंतर्गत नाराजी - म्हाडात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता असे समजले जाते. हा भ्रष्टाचार याच वेटिंग लिस्टमुळे होत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते त्यामुळे शासनाने ही प्रतीक्षा यादीची पद्धतच बंद करून टाकण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यामुळे म्हाडाच्या विविध विभागांमध्ये वाद सुरू झाले. शासनाच्या निर्णयानंतर औरंगाबाद मंडळाची घरांची सोडत प्रतीक्षा यादीविनाच जाहीर करण्यात आली. औरंगाबादमध्ये म्हाडाची घरेच विकली जात नव्हती. त्यामुळे तिथल्या मंडळासमोर मोठा पेच निर्माण झाला. घरेच विकली जात नसल्याने म्हाडाच्या काही मंडळांनी प्रतीक्षायादी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली. अखेर या अंतर्गत नाराजीवर आता तोडगा काढण्यात आला आहे.
वाद मिटला आता पुन्हा वेटिंग - म्हाडा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाची औरंगाबाद पुणे अशी विविध उपमंडळ आहेत. या अशा राज्यातील विविध मंडळांमधून म्हाडा प्राधिकरणाला प्रतीक्षा यादीबाबत विरोध केला जात होता. मात्र, या नाराजीबाबत झालेल्या बैठकीत म्हाडा प्राधिकरणाने या प्रतीक्षा याद्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (1 year waiting for Mumbai metro) म्हाडा प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आता मुंबईत घरांसाठी एक वर्षाची वेटिंग असेल. (6 months waiting for rest of Maharashtra) तर उर्वरित ठिकाणी सहा महिन्याची वेटिंग असेल. म्हाडाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.