ETV Bharat / city

विरार रुग्णालयाच्या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू; पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडले प्राण - विरार विजय वल्लभ रुग्णालय

Virar Hospital fire LIVE updates
LIVE Updates : विरारमधील रुग्णालयाच्या आयसीयू विभागात आग; १३ रुग्ण दगावले..
author img

By

Published : Apr 23, 2021, 6:41 AM IST

Updated : Apr 23, 2021, 10:22 PM IST

16:39 April 23

भंडारा,नाशिक, विरार येथे रुग्णालयात घडलेल्या दुर्घटना भविष्यात पुन्हा होऊ नये- खासदार नवनीत राणा

दुर्घटना भविष्यात पुन्हा होऊ नये

अमरावती- दोन दिवसांपूर्वीच ऑक्सिजन टँक लिकीज झाल्यामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा विरार मध्ये कोविड रुग्णालयाला आग लागून 14 रुग्णांचा अंत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शासकीय-खासगी दवाखान्यांचे तात्काळ थर्ड पार्टी ऑडिट करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. विरारसारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी प्रतिक्रियाही खासदार राणा यांनी दिली आहे. 

15:46 April 23

विरारमध्ये पति पत्नीचा मृत्यू...!

विरारमध्ये पति पत्नीचा मृत्यू...!

पालघर- विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत पती गेल्याचे समजताच रुग्णाच्या पत्नीचेदेखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चांदणी दोषी असलेल्या निधन महिलेचे नाव आहे.  कुमार दोशी या 45 वर्षीय रुग्णाचा या इस्पितळात लागलेल्या आगीत मृत्यू झाला.  हे दोशी कुटुंब वसईच्या १०० फूट रोड परीसरात रहात होते.  तर चांदणी दोशी यांच्यावर विरारच्या जिवदानी हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार सुरू होते. 

13:08 April 23

आगीत लोकांचा मृत्यू ही घटना दुःखद; यावर असे वक्तव्य असंवेदनशील - फडणवीस

नागपूर - विरार आगीच्या घटनेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे असे म्हणाले की अश्या घटना काही नॅशनल न्यूज नाही ज्यात पंतप्रधान यांच्याशी बोलले पाहिजे या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की हे असंवेदनशील वक्तव्य आहे, ते कुठल्या मानसिकतेत म्हणाले हे मला माहित नाही. पण आपण असंवेदनशील असले पाहिजे. या दुखद घटनांमध्ये अश्या प्रकारची प्रतिक्रिया देणे हे अयोग्य असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

12:25 April 23

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया..

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया..

12:25 April 23

मृतांची संख्या १४ वर..

या दुर्घटनेत बळी गेलेल्या रुग्णांची संख्या १४वर पोहोचली आहे.

10:24 April 23

प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून ऐका काय घडलं रात्री..

10:23 April 23

ही काही नॅशनल न्यूज नव्हे - राजेश टोपे

  • #WATCH Virar fire incident, not national news...says Maharashtra Health Minister Rajesh Tope

    13 people have lost their lives in a fire incident at Vijay Vallabh COVID care hospital in Maharashtra's Virar pic.twitter.com/hNZEHIbnLp

    — ANI (@ANI) April 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

09:50 April 23

पालघर जिल्हाधिकारी माणिकराव घुसाळेंची प्रतिक्रिया..

जिल्हाधिकारी माणिकराव घुसाळेंची प्रतिक्रिया..

09:42 April 23

मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत - एकनाथ शिंदे

ही मोठी दुर्घटना आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल. तसेच रुग्णालयातील इतर रुग्णांना दहिसर रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

09:21 April 23

वसई-विरार रुग्णालय आग दुर्घटनेप्रकरणी राजेश टोपेंचे चौकशीचे आदेश

वसई-विरारमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.. माझ्याकडे शब्द नाहीत. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. ते पुढे म्हणाले, की विरार महानगर पालिकेचे आयुक्त संबंधीत अधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशीही बोलणे झाले आहे. भंडाऱ्याला जशी घटना घडली तशीच ही घटना आहे. एसीमध्ये स्फोट होऊन ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याची चौकशी केली जाईल. आगीच्या दुर्घटनेनंतर त्या परिसरात एकदम धूर पसरला, त्यामुळे गुदमरून 13 रुग्णांचा जीव गेला. पण दरवाज्याजवळ असलेल्या रुग्णांना वाचवता आलं. या घटनेची चौकशी होऊन, कारवाई होईल. फायर ऑडिट करण्याच्या सूचना आधीच करण्यात आल्या होत्या. खाजगी लोकांकडून हे वल्लभ हॉस्पिटल चालवण्यात येत होते. ऑडिट झाले होते का? स्फोट कसा झाला याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

09:18 April 23

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी वाहिली श्रद्धांजली; दिले चौकशीचे आदेश..

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या दुर्घटनेची दखल घेत मृतांना श्रद्धांजली वाहिली. विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. असे ट्विट गृहमंत्र्यांनी केले.

09:15 April 23

नाशिक व विरारसारख्या रुग्णालय दुर्घटना घडणं क्लेशदायक - उपमुख्यमंत्री

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 

09:11 April 23

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहभावना असतील. तसेच, जखमी रुग्ण लवकर बरे व्हावेत असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

09:04 April 23

रुग्णाचे नातेवाईक सांगतायत आपबीती..

रुग्णाचे नातेवाईक सांगतायत आपबीती..

09:03 April 23

08:55 April 23

राज्यातील सगळ्या हॉस्पिटलचे फायर ऑडिट त्वरित करा; किरीट सोमय्यांची मागणी

राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे. राज्याने केंद्राकडे त्वरित मदत मागून, आर्मीच्या मदतीने प्रत्येक हॉस्पिटलमधील फायर ऑडिट आणि ऑक्सिजन ऑडिट केलं पाहिजे. राज्य सरकारने आपली जबाबदारी समजली पाहिजे, आणि ह्या सगळ्याला जबाबदार असणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा. अशी मागणी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

08:53 April 23

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश..

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये, तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

08:51 April 23

राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक..

पालघरमधील दुर्घटनेबाबत ऐकून दुःख झाले. मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहभावना असतील. तसेच, जखमी रुग्ण लवकर बरे होतील अशी प्रार्थना; अशा आशयाचे ट्विट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

08:51 April 23

मृतांची नावं –

  • उमा सुरेश कनगुटकर
  • निलेश भोईर
  • पुखराज वल्लभदास वैष्णव
  • रजनी आर कडू
  • नरेंद्र शंकर शिंदे
  • जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
  • कुमार किशोर दोशी
  • रमेश टी उपयान
  • प्रविण शिवलाल गोडा
  • अमेय राजेश राऊत
  • रामा अण्णा म्हात्रे
  • सुवर्णा एस पितळे
  • सुप्रिया देशमुखे

08:49 April 23

आयसीयूमध्ये सुरू होते कोरोना बाधितांवर उपचार..

या आगीमध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी याबाबत माहिती दिली.

07:57 April 23

रात्रीच आगीवर नियंत्रण..

आगीची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले होते. विजय वल्लभ रूग्णालयात रुग्णालय प्रशासनाची स्वत:ची आगीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. 

07:22 April 23

रुग्णालयाचे संचालक दिलीप शाह..

रात्री तीनच्या सुमारास ही आग लागली. रुग्णालयात एकूण सुमारे ९० रुग्ण होते. या सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक दिलीप शहा यांनी दिली.

06:37 April 23

विरारमधील रुग्णालयाच्या आग; 14 रुग्ण दगावले..

विरारमधील रुग्णालयाच्या आयसीयू विभागात आग; सुमारे १३ जण दगावले..

पालघर : नाशिकमधील ऑक्सिजन लीकची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, विरारमध्ये एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही दुर्घटना घडली. रात्री तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये ही आग लागली होती. याठिकाणी १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यांपैकी १३ रुग्ण दगावल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक दिलीप शहा यांनी दिली आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीचेही ह्रदयविकाराने निधन झाले आहे. 

दरम्यान, अतिदक्षता विभागातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत या रुग्णालयांमध्ये झाल्या होत्या आग दुर्घटना.. 

  • नागपूरच्या वाडी परिसरात वेलट्रीट हॉस्पिटल आहे. याला ९ एप्रिल रोजी आग लागली होती, यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.
  • विदर्भातील गोंदियात रुग्णालयात आग लागल्याने दहा जणांचा बळी गेला होता.
  • मुंबईतील भांडूप येथील सनराईज हॉस्पिटलला २६ मार्च रोजी आग लागली होती, या दुर्घटनेत ११ जणांचा बळी गेला होता.

Last Updated : Apr 23, 2021, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.