मुंबई - मनी लाँडरिंग संदर्भात चौकशी करत असलेल्या ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याला चौकशीसाठी ४ वेळा समन्स पाठवण्यात आल्यानंतरही विहंग सरनाईक हा चौकाशीसाठी हजर झालेला नाही. मात्र, बुधवारी विहंग सरनाईक हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला नाही तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे पर्याय खुले असल्याचं ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
हेही वाचा -योगी यांच्या मुंबई दौऱ्याविरोधात मनसेची बॅनरबाजी, योगींना म्हणाले "ठग"
विहंग सरनाईकला दिले होते ४ वेळा समन्स
या अगोदर केलेल्या कारवाईदरम्यान प्रताप सरनाईक यांच्या मुंबई व ठाण्यातील घर, कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली होती. ही छापेमारी ईडीच्या दिल्लीतल्या पथकाने केली होती. त्यानंतर ईडी कडून विहंग सरनाईकला पाचतास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ४ वेळा विहंगला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र आजारी असल्याचं कारण देत विहंग याने चौकशीसाठी हजेरी लावली नव्हती. तर दुसरीकडे आमदार प्रताप सरनाईक शहराबाहेर असल्यामुळे ज्यावेळी मुंबईत आले होते, तेव्हा त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांची क्वारंटाईनची मुदत संपत असून यानंतर त्यांना गुरुवारी ईडी चौकशीला सामोरे जावे लागेल.
हेही वाचा -योगींचा पंगा मुंबईशी आहे का? - संजय राऊत