मुंबई : विधानसभा अंधेरी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला (Vidhan Sabha Andheri by election program announced) आहे. १४ ॲाक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. १७ ॲाक्टोबरला अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारिख आहे. ३ तारखेला मतदान होईल. तर ६ नोहेंबरला निकाल लागेल. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीत पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार सामना रंगणार आहे. शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक (Vidhan Sabha election) होत आहे.
शिवसेना विरोधात भाजप थेट लढत - आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. शिवसेनेचा हा मतदार संघ आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याचे शक्यता असताना भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली (Vidhan Sabha Andheri election)आहे.
शिंदेंच्या बंडानंतर पहिली निवडणूक - आम्हीच शिवसेना, असा उर बडवणाऱ्या शिंदे गटाने शिवसेनेची जागा भाजपला दिली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप, असा सामना रंगणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील ही पहिली निवडणूक आहे. त्यामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता अंधेरी मतदारसंघात कोण बाजी मारणार ? याकडे लक्ष लागले असून शिवसेनेच्या नवा पक्ष चिन्हावरून पेच निर्माण झाला (Vidhan Sabha) आहे.
हृदयविकाराने लटकेंचे निधन - मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी ११ मे २०२२ संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झाले होते. आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूळचे कोल्हापुरातील शाहूवाडीचे असलेल्या लटके यांचा मतदार संघात दबदबा निर्माण केला होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती.