ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2022 : फडणवीसांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची व्यूहरचना; ऐनवेळी ठरवणार कोटा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणूक

विधानपरिषदेला निवडणुकीला ( Vidhan Parishad Election 2022 ) काही वेळ झाला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( CM Uddhav Thackeray ) व्यूहरचना आखली. दगाफटका होण्याच्या भितीने ऐनवेळी मतांचा कोटा ठरवण्यात येणार आहे.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray
author img

By

Published : Jun 19, 2022, 12:12 PM IST

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीला ( Vidhan Parishad Election 2022 ) काही तासांचा अवधी शिल्लक आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. शिवसेनेही सर्व आमदारांना नजरकैदेत ठेवले असून, राज्यसभेच्या निवडणुकीत दगाफटका झाल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत सावध पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी त्यानुसार मतांचा कोटा ऐनवेळी ठरवण्याचा निर्णय घेणार आहेत. भाजपाला विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने ही व्यूहरचना आखल्याचे बोलले जाते.

शिवसेनेची रणनिती - विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी ( 20 जून ) मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 26 मतांची आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी त्यानुसार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मताधिक्याच्या जोरावर सहावा उमेदवार निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत धोका टाळण्यासाठी ऐनवेळी मतदार आणि मतांचा कोटा शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवणार आहेत.

छोटे पक्ष, अपक्षांकडे नजरा - राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांच्या मतांचा भाव वधारला होता. राज्यसभा निवडणुकीत सपा आणि एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. तर, बहुजन विकास आघाडीने आपले मत भाजपाला दिल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पार्टीने अद्याप कुणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट केलेले नाही. अपक्ष आमदारांनीही कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे अपक्ष आणि छोटे पक्षांच्या आमदारांकडे लक्ष राहणार आहे.

शिवसेना आमदार नजरकैदेत - येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये नजर कैदेत ठेवले आहे. हॉटेलमधील सभागृहात आज ( 19 जून ) उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील.

हेही वाचा - Vidhan Parishad Election 2022 : राज्यसभेला फटका, विधान परिषदेसाठी नाराज आमदारांना शिवसेनेकडून महामंडळाचे 'गाजर'

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.