मुंबई : एसटीचे विलीनकरण शक्य नाही असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाल्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसटीच्या विलीनीकरणाविषयीच्या मागणीवर बोलताना कायद्याने विलीनीकरण करता येत नाही असे सुधीर मुनगंटीवार यात बोलताना दिसतात. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
एक व्यक्ती एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सुधीर मुनगंटीवार यांना देऊन मागण्या मान्य करण्याची विनंती मुनगंटीवार यांना करत असल्याचे या व्हिडिओत ऐकायला मिळते. त्यावर बोलताना एसटीचे कायद्याने विलीनीकरण करता येत नाही असे मुनगंटीवार बोलत असल्याचे यात दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सध्या राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ आता सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.
-
#भाजपा नेते एस टी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत. उच्च न्यायालयाने संपावर बंदी घालून समिती गठीत केली व राज्य सरकारने इतर मागण्या मान्य केल्या. मग आंदोलन का?एसटी कर्मचाऱ्यांनी अशा संधीसाधूंना थारा देऊ नये. भाजपाच्या भूमिका कशा बदलतात ते पहा. #महाराष्ट्रद्रोही_भाजपा pic.twitter.com/e9OMStnlso
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#भाजपा नेते एस टी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत. उच्च न्यायालयाने संपावर बंदी घालून समिती गठीत केली व राज्य सरकारने इतर मागण्या मान्य केल्या. मग आंदोलन का?एसटी कर्मचाऱ्यांनी अशा संधीसाधूंना थारा देऊ नये. भाजपाच्या भूमिका कशा बदलतात ते पहा. #महाराष्ट्रद्रोही_भाजपा pic.twitter.com/e9OMStnlso
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 10, 2021#भाजपा नेते एस टी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत. उच्च न्यायालयाने संपावर बंदी घालून समिती गठीत केली व राज्य सरकारने इतर मागण्या मान्य केल्या. मग आंदोलन का?एसटी कर्मचाऱ्यांनी अशा संधीसाधूंना थारा देऊ नये. भाजपाच्या भूमिका कशा बदलतात ते पहा. #महाराष्ट्रद्रोही_भाजपा pic.twitter.com/e9OMStnlso
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 10, 2021
सचिन सावंत यांनीही ट्विट केला व्हिडिओ
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. "#भाजपा नेते एस टी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत. उच्च न्यायालयाने संपावर बंदी घालून समिती गठीत केली व राज्य सरकारने इतर मागण्या मान्य केल्या. मग आंदोलन का?एसटी कर्मचाऱ्यांनी अशा संधीसाधूंना थारा देऊ नये. भाजपाच्या भूमिका कशा बदलतात ते पहा." असे ट्विट सावंत यांनी केले आहे.
हेही वाचा - सहकार्य करा, राजकीय पोळ्या भाजू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन