ETV Bharat / city

Actress Vatsala Deshmukh Passes Away : पिंजरा फेम ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री वत्सला देशमुख कालवश - अभिनेत्री वत्सला देशमुख

मराठी आणि हिंदी सिने चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज मुंबईत निधन ( Veteran film actress Vatsala Deshmukh passed away ) झाले. त्यांच्या निधनाने कला जगतातील आणखी एक तारा निखळला. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.

Actress Vatsala Deshmukh Passes Away
अभिनेत्री वत्सला देशमुख कालवश
author img

By

Published : Mar 12, 2022, 7:35 PM IST

मुंबई - मराठी आणि हिंदी सिने चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज मुंबईत निधन ( Veteran film actress Vatsala Deshmukh passed away ) झाले. त्यांच्या निधनाने कला जगतातील आणखी एक तारा निखळला. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.

पिंजरातील भूमिका आजरामर -

हिंदी आणि मराठी सिनेमा चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. वत्सला देशमुख यांनी पिंजरा चित्रपटात केलेली अक्काची भूमिका अजरामर झाली. या भूमिकेतील वत्सला यांच्या तोंडी असलेले संवाद सिनेरसिकांच्या मनावर आजही ठसलेले आहेत. या चित्रपटात त्या आपल्या छोट्या भगिनी दिवंगत अभिनेत्री संध्या यांच्यासोबत काम करत होत्या. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.

या चित्रपटातील भूमिका गाजल्या -

जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, नवरंग आया तुफान हिंदी सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे ठसा उमटवला तर पिंजरा बाळा गाऊ कशी अंगाई या मराठी चित्रपटातून त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीतील आणखी एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

हेही वाचा - Minor Lover Couple Suicide Nagpur : धक्कादायक.. अल्पवयीन प्रेमीयुगुलाची धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.