नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai APMC Market) शेपूच्या १०० जुडयांच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. मेथीच्या (Fenugreek Rate Increase In Mumbai) दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या (वालवड) एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडी ( lady's finger Rate Increase In Mumbai APMC Market ) व गवारच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. एकंदरीतच भाज्यांचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. ऐन नवरात्रीत अनेक नागरिकांचा शाकाहाराकडे ओढा असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडून जाणारे आहे. घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारात होणार असून, तिथे भाज्या आणखी चढ्या भावाने विकल्या जात आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
- भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ५६०० रुपये
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० रुपये ते १०००० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३८०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४८०० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६,००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो ७००० रुपये ते ८००० रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४००रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६०००रुपये
- मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
पालेभाज्या
- कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
- कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३५०० रुपये ते ४००० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
- मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ६००रुपये ते १००० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २४०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये २००० रुपये