ETV Bharat / city

Sonam Shulka Murder Case : १९ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून फेकला

मुंबईमध्ये प्रेमप्रकरणातून घडलेल्या हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. १९ वर्षीय सोनम शुक्ला हिची हत्या करण्यात आली ( Sonam Shukla Murder Case ) होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अन्सारी नावाच्या आरोपीला अटक केली ( Mohammad Ansari Arrested ) आहे.

सोनम शुक्ला हत्या प्रकरण
author img

By

Published : May 6, 2022, 7:38 AM IST

Updated : May 6, 2022, 1:20 PM IST

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पोलिसांना समुद्रकिनाऱ्यावर गोणीत भरलेल्या अवस्थेत एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला होता. NEET परीक्षेची तयारी करणारी 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लाच्या ( Sonam Shukla Murder Case ) हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारी ( Mohammad Ansari Arrested ) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने सोनमचा गळा दाबून खून करत मृतदेह नाल्यात फेकून दिला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

सोनम 25 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिकवणीला जाण्यासाठी तिच्या घरातून निघाली होती. त्यानंतर ती बेपत्ता होती. तिचा मृतदेह वर्सोवा भागात समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आला होता. ती गोरेगाव पश्चिम भागातील प्रेमनगर भागात वास्तव्यास होती. सोनम शिकवणीला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर गेली. पण ती शिकवणीला गेली नाही. रात्री 9 च्या सुमारास ती एका मैत्रिणीच्या व मित्राच्या घरी गेली होती. सोनम रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी तिला फोन केला. त्यावेळी तिने लवकरच घरी येणार असल्याचे, सोनमने वडिलांना सांगितलं. पण रात्री 11.30 वाजले तरी सोनम घरी आली नसल्याने वडिलांनी तिला पुन्हा फोन केला पण तो बंद लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोनम शुक्ला हत्या प्रकरण

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम ही बेकरी मालक असलेल्या मोहम्मद अन्सारीच्या घरी गेली. त्यावेळी मोहम्मदाचे आई-वडील घरी नव्हते. सोनम आणि आरोपी अन्सारी हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते. त्यांच्यात यावेळी वाद झाले. अन्सारीने सोनमला घरी बोलावून तारेच्या वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर हात पाय बांधून तिचा मृतदेह एका पोत्यात भरून मालाड पश्चिमच्या नाल्यात टाकून दिले होते. सोनम घरी न आल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी सोनमचा मृतदेह आढळून आला. वडिलांनी आरोपीचा उल्लेख केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीने सोनमच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी अन्सारीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : Son in Law Murder Father in Law : शुल्लक कारणावरून जावयाने सासर्‍याला ढकलले कालव्यात, दोघांचा मृत्यू

Last Updated : May 6, 2022, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.