ETV Bharat / city

अजबच.. कोरोना लस न घेताच मिळाले प्रमाणपत्र, मुंबईतील दुसरी घटना

author img

By

Published : May 5, 2021, 2:06 AM IST

Updated : May 5, 2021, 2:14 AM IST

मुंबईतील एका लसीकरण केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकास लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्रच हातात मिळाले. ही घटना भांडुप येथील लसीकरण केंद्रात घडली.

vaccine Certificate issue without corona vaccination

मुंबई - कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात येत आहे. मात्र एका लसीकरण केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी महेश मेजारी भांडुप येथील लसीकरण केंद्रात गेले होते. तेव्हा नोंदणी करायला गेले आणि लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्रच हातात आले. अशा प्रकारची घटना ही दुसऱ्यांना घडली असून राजावाडी येथे देखील नाईक दाम्पत्यासोबत अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

कोरोना लस न घेताच मिळाले प्रमाणपत्र
लस दिली नसताना देखील लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्याला दिल्याचा दुसरा प्रकार भांडुपमध्ये समोर आला आहे. भांडुपमध्ये राहणारे महेश मेजारी यांनी 27 एप्रिल रोजी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. यासाठी ते भांडुप येथील पवार पब्लिक स्कूल जवळ असलेल्या लसीकरण केंद्रावर गेले होते. परंतु त्याठिकाणी सर्वर डाऊन असल्याचे कारण सांगून त्यांना लस देण्यात आली नाही. अखेर काही दिवसांनी पुन्हा एकदा मेजारी यांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची नोंदणी झाली नाही. उलट त्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. तसेच दुसऱ्या डोसची तारीख देखील या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात लस घेतली नसतानादेखील लसीकरणाचे प्रमाणपत्र कसे काय मिळाले, असा प्रश्न सध्या मेजारी यांना पडला आहे. तसेच त्यांना लसीचा पहिला डोस मिळणार की नाही, या संभ्रमावस्थेत ते आहेत.
या अगोदरही घडली होती अशी घटना -
एकीकडे लसीकरण करा म्हणून सरकार लोकांना आवाहन करत आहे. मात्र, दुसरीकडे लसीकरण करताना सावळा गोंधळ समोर आला आहे. कारण, लस न घेताच लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाटकोपरमधल्या नाईक दांपत्याने लसीचा पहिला डोस घेतला मात्र दुसरा डोस घेण्याआधीच त्यांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले म्हणून अभिनंदनाचा मेसेज आला आणि थेट अधिकृत प्रमाणपत्रही मिळाले. हे प्रकरण समजून घेण्यासाठी महापूर किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात धाव घेतली व हे प्रकरण समजून घेतले.

Last Updated : May 5, 2021, 2:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.