मुंबई - देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लसीकरण दोन दिवस स्थगित करण्यात आले होते. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 12 लसीकरण केंद्रांच्या 80 बूथवर 6387 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून, 8 जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आले. आतापर्यंत 53 हजार 784 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
आज झालेले लसीकरण
मुंबईत आज 8000 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महापालिकेच्या 11 तर राज्य सरकारच्या 1 अशा एकूण 12 लसीकरण केंद्रांमधील 80 बूथवर 6387 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मुंबईत आज एकूण उद्दिष्टापैकी 80 टक्के लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 640, सायन येथील टिळक रुग्णालय 320, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 627, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 865, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 95, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 958, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 1119, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 700, बांद्रा भाभा हॉस्पिटल 294, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 52, सेव्हन हिल 298, गोरेगाव नेस्को 419 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
आतापर्यंत 53,784 जणांचे लसीकरण
16 जानेवारीपासून आतापार्यंत 53 हजार 784 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 7102, सायन येथील टिळक रुग्णालय 3691, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 5516, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 6449, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 1254, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 8246, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 8148, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 5766, बांद्रा भाभा हॉस्पिटल 3447, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 385, सेव्हन हिल 2238, गोरेगाव नेस्को 1542 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.