ETV Bharat / city

मुंबईत शनिवारी 55 हजार 843 लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण - मुंबई न्यूज अपडेट

मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज शनिवारी 55 हजार 843 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

मुंबई कोरोना लसीकरण अपडेट
मुंबई कोरोना लसीकरण अपडेट
author img

By

Published : May 29, 2021, 10:41 PM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज शनिवारी 55 हजार 843 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 31 लाख 89 हजार 154 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत आज 55 हजार 843 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 54 हजार 243 लाभार्थ्यांना पहिला तर 1 हजार 600 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 31 लाख 89 हजार 154 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, त्यात 24 लाख 42 हजार 592 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 46 हजार 562 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 2 हजार 423, फ्रंटलाईन वर्करांना 3 लाख 60 हजार 543, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 12 हजार 098, 45 ते 59 वर्षांमधील नागरिकांना 11 लाख 31 हजार 562 तर 18 ते 44 वर्षांमधील नागरिकांना 1 लाख 81 हजार 964 तसेच 564 स्तनदा मातांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षांमधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

एकूण लसीकरण -

आरोग्य कर्मचारी - 3,02,423
फ्रंटलाईन वर्कर - 3,60,543
जेष्ठ नागरिक - 12,12,098
45 ते 59 वयोगट - 11,31,562
18 तर 44 वयोगट - 1,81,964
स्तनदा माता - 564
एकूण - 31,89,154

हेही वाचा - 'देशातील लस निर्मिती कंपन्यांकडून अपेक्षित लसींचा पुरवठा नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.