मुंबई - कोरोनाविरोधातील निर्णायक लढ्यात मुंबईत आज 44 हजार 683 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. आजतागायत एकूण 6 लाख 47 हजार 684 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आजपर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
आज लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 44 हजार 683 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 39 हजार 505 लाभार्थ्यांना पहिला तर 5 हजार 178 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत एकूण 6 लाख 47 हजार 684 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 5 लाख 66 हजार 090 लाभार्थ्यांना पहिला तर 81 हजार 594 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत एकूण 1 लाख 98 हजार 711 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 36 हजार 288 फ्रंटलाईन वर्कर, 2 लाख 75 हजार 618 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 37 हजार 67 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा-पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज
महापालिकेतील लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 21 हजार 788 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 235 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 26 हजार 23 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 4 लाख 20 हजार 763 लाभार्थ्यांना पहिला तर 69 हजार 465 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 4 लाख 90 हजार 228 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा-मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या
सरकारी रुग्णालयातील लसीकरण -
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 1 हजार 948 लाभार्थ्यांना पहिला तर 367 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 हजार 315 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 19 हजार 152 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 931 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 22 हजार 83 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयातील लसीकरण -
खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील आज 15 हजार 769 लाभार्थ्यांना पहिला तर 576 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 16 हजार 345 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 1 लाख 26 हजार 175 लाभार्थ्यांना पहिला तर 9 हजार 198 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 35 हजार 373 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
- आरोग्य कर्मचारी - 1,98,711
- फ्रंटलाईन वर्कर - 1,36,288
- ज्येष्ठ नागरिक - 2,75,618
- 45 ते 59 वय - 37,067
- एकूण - 6,47,684