ETV Bharat / city

'कोरोना प्रतिबंधक लशी १०० टक्के परिणामकारक नाहीत, लसीकरणानंतरही अँटीबॉडीची निर्मिती नाही' - कोरोना लसीकरण

कोरोना काळात पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये राज्यात अनेक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोविडला आटोक्यात आण्यासाठी देशात लसीकरण युद्धपातळीवर राबवले जात आहे. देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांवर या लसीचा परिणाम दिसून आला नाही.

antibody is produced even after vaccination

author img

By

Published : May 22, 2021, 9:17 PM IST

Updated : May 28, 2021, 3:36 PM IST

मुंबई - कोरोना काळात पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये राज्यात अनेक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोविडला आटोक्यात आण्यासाठी देशात लसीकरण युद्धपातळीवर राबवले जात आहे. देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांवर या लसीचा परिणाम दिसून आला नाही. यासंबंधी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांना प्रश्न विचारले असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उपलब्ध लस या शंभर टक्के प्रभावी नाहीत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे मात्र लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या लाभार्थ्यांवर या लसीचा प्रभाव झाला नाही. किंबहुना त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. लस शंभर टक्के प्रभावी नसल्यामुळे आपल्याला काही या केसेस दिसत आहेत.

कोविशिल्ड लसीची एफीकसी 70 टक्के आहे तर कोव्हॅक्सिन लसीची एफीकसी 78 टक्के आहे.

म्युकर मायकोसिस दुर्मिळ आजार -

त्याच बरोबर डॉक्टर प्रदीप आवटे यांना म्युकर मायकोसिस या रोगासंदर्भात देखील विचारणा करण्यात आली. यावेळी डॉक्टर आवटे यांनी याची माहिती दिली आहे. त्यानुसार, म्युकर मायकोसिस म्हणजे काळी बुरशी हा आजार दुर्मिळ आहे. हा आजार कोरोना नसलेल्या व्यक्तीलाही होऊ शकतो. मात्र कोरोना काळामध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना काळामध्ये असे अनेक रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार आहेत. उपचारादरम्यान रुग्णांना स्टेरॉइडचे इंजेक्शन द्यावं लागते. यामुळे हे आजार होत आहेत, अशी माहिती डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिली.

Last Updated : May 28, 2021, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.