ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : 'आत्मनिर्भर' बनत त्याने शोधली स्वयंरोजगाराची वाट! - मुंबई मासेमारी

टाळेबंदीमुळे घरोघरी मासे विक्री करणारे परप्रांतीय गावी गेले आहेत. याच संधीचा फायदा घेत अमेरिकेतून परतावे लागलेल्या अभिषेक शिगवण याने 'स्टार्टअप' संकल्पना अंमलात आणली आहे. सोशल मीडियाचा वापर करत त्याने स्वयं रोजगाराची वाट शोधली; आणि घरपोच मासेविक्रीला सुरुवात केली.

start ups in mumbai
ईटीव्ही भारत विशेष : 'आत्मनिर्भर' बनत त्याने शोधली स्वयंरोजगाराची वाट!
author img

By

Published : Jul 17, 2020, 7:31 AM IST

मुंबई - टाळेबंदीमुळे घरोघरी मासे विक्री करणारे परप्रांतीय गावी गेले आहेत. याच संधीचा फायदा घेत अमेरिकेतून परतावे लागलेल्या अभिषेक शिगवण याने स्टार्टअप संकल्पना अंमलात आणली आहे. सोशल मीडियाचा वापर करत त्याने स्वयं रोजगाराची वाट शोधली; आणि घरपोच मासेविक्रीला सुरुवात केली.

ईटीव्ही भारत विशेष : 'आत्मनिर्भर' बनत त्याने शोधली स्वयंरोजगाराची वाट!

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. तर कित्येकांना परदेशातून पुन्हा परतावे लागले आहे. विक्रोळीतील अभिषेक शिगवण याने अमेरिकेतून परतावे लागल्यानंतर मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला. ऑर्डर स्वीकारणे आणि वितरकाकडून मासे घेणे, अशी कामं सध्या तो करत आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळालाय. श्रावण सुरू झाल्यानंतर मासेविक्री कमी होईल, पण या काळात भाजी विक्रीचा पर्याय समोर असल्याचे त्याने सांगितले.

अभिषेकचे शिक्षण हॉस्पिटॅलिटी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाले आहे. अमेरिकेत कामानिमित्त तो गेला होता. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनामुळे त्याला भारतात परतावे लागले. 3 मे ते 3 जून असा तब्बल 1 महिन्यांचा प्रवास करत जहाजाने तो भारतात परतला. त्यानंतर 14 दिवस विलगीकरण कक्षात राहून तो घरी आला. यानंतर त्याने मत्सविक्रीला सुरुवात केली.

रायगडमधील मुरुड हे अभिषेकचे गाव आहे. त्यामुळे मासेविक्रीबद्दल त्याला आधीच माहिती होती. सध्या घरपोच मासेविक्रीची सेवा देणारे परप्रांतीय विक्रेते गावी गेले आहेत. त्यामुळे संधीचं सोनं करत त्याने या व्यवसायात पाय रोवले. सोशल मीडियामार्फत त्याने स्टार्टअप संकल्पना सुरू केली आहे.

ग्राहकांना ताजी मासळी मिळण्यासाठी तो एक दिवस आधीच ऑर्डर घेतो. बोंबील, पापलेट, कोळंबी, सुरमई आदी माशांची तो विक्री करतो. कुर्ला ते ठाणे या भागात बाईकवरून तो ऑर्डर पोहोचवतो. घरपोच सेवा आणि ताजी मासळी मिळत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कामासाठी त्याला त्याचे आई-वडील देखील मदत करतेयत.

लहानपणापासूनच आई वडिलांनी कोणते काम हे छोटे किंवा मोठे नसते हे शिकवले. ही शिकवण मी कायम ठेवली आहे, असे अभिषेकने सांगितले. यातून प्रेरणा घेऊन मी मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे तो म्हणाला. मी शिपिंग क्षेत्रात असल्यामुळे पुन्हा कधी बोलावतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे आत्ता संधीचा फायदा घेत व्यवसायाला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.