ETV Bharat / city

अनलॉक २.० : सरकारने कंबर कसली; 'या' गोष्टींवर बंदी कायम - अनलॉक-२

महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्प्याटप्प्याने शिथीलता दिली जाणार आहे. यासाठी अनलॉक-२ ची सुरुवात होणार आहे.

mumbai covid updates
अनलॉक-२ ची उद्यापासून सुरुवात होणार आहे.
author img

By

Published : Jun 30, 2020, 6:47 PM IST

मुंबई - महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे.

कोणत्या गोष्टी बंधनकारक

1. मास्क घालून तोंड झाकणे अनिवार्य
2. सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक
3. लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नकोत, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी चालणार नाही
4. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
5. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध

कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना

  • शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे
  • कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, हॅन्ड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
  • दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाज्यांसारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाइझ कराव्यात
  • दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी घ्यावी

    मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह मंजुरी

    1. अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहणार
    2. इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडतील. मद्य दुकाने परवानगी असल्यास उघडतील (होम डिलिव्हरी किंवा प्रत्यक्ष विक्री)
    3. आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री करण्यास मंजुरी
    4. औद्योगिक कामे करण्यास मंजुरी
    5. खासगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट, मान्सूनपूर्व कामे करण्यास मंजुरी
    6. होम डिलिव्हरी रेस्टॉरंट/किचनला मान्यता
    7. ऑनलाइन/दूरशिक्षणाला मान्यता
    8. सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) 15 टक्के किंवा 15 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
    9. सर्व खासगी कार्यालये 10 टक्के किंवा 10 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील

    टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2
    दुचाकी – केवळ चालक

    10. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करून काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

    11. एमएमआर क्षेत्रा अंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा (मुंबई-ठाणे इत्यादी) प्रवास करण्यास मुभा. मात्र खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा नाही

    12. लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉल यांनाच मान्यता

    13. सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी

    14. वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण मंजूर

    15. शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करू शकतात

    16. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा

    17. जिल्हांतर्गत बस सेवा 50 टक्के प्रवाशांसह मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.