ETV Bharat / city

Union Budget 2022 : थोडी खुशी, थोडा गम असा संमिश्र अर्थसंकल्प - ललित गांधी - ललित गांधी

पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात घेता मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पातून केल्या जातील, अशी आशा होती. मात्र, अशा घोषणा या अर्थसंकल्पात दिसल्या नाहीत. पायाभूत सुविधा आणि शेती क्षेत्राला दिलासा देणाऱ्या अनेक योजनांची घोषणा या अर्थसंकल्पामधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Seetharaman on budget 2022 ) यांनी केली. एकंदरीत थोडी खुशी थोडा गम, असा संमिश्र अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ( Maharashtra Chamber of Commerce ) अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 1, 2022, 5:04 PM IST

Updated : Feb 1, 2022, 6:22 PM IST

मुंबई - पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात घेता मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पातून ( Union Budget 2022 ) केल्या जातील, अशी आशा होती. मात्र, अशा घोषणा या अर्थसंकल्पात दिसल्या नाहीत. पायाभूत सुविधा आणि शेती क्षेत्राला दिलासा देणाऱ्या अनेक योजनांची घोषणा या अर्थसंकल्पामधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Seetharaman on budget 2022 ) यांनी केली. एकंदरीत थोडी खुशी थोडा गम, असा संमिश्र अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ( Maharashtra Chamber of Commerce ) अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी

पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या घोषणांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती - अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Seetharaman on budget 2022 ) यांनी सादर केलेल्या आजच्या अर्थसंकल्पामध्ये ( Union Budget 2022 ) पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या आहेत. खास करून लॉजिस्टिक क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले असून कार्गो टर्मिनल तयार करण्याबाबत यामध्ये सांगण्यात आले आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गत सात माध्यमांना जोडून रोड, रेल आणि विमान या क्षेत्रात मोठे बदल केले जाणार आहे. तसेच पाच नद्या जोडण्याच्या प्रकल्पाची सुरुवात करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे शेती व इतर उद्योगाला फायदा मिळेलच तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ( Maharashtra Chamber of Commerce ) उपाध्यक्ष करुनाकर शेट्टी यांनी दिली.

हेही वाचा - Union Budget 2022 : छगन भुजबळ आणि यशोमती ठाकूर यांची अर्थसंकल्पावर टीका, म्हणाले...

Last Updated : Feb 1, 2022, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.