ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Amravati: उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शहिम अहमद न्यायालयीन कोठडीत रवानगी

अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याकरिता येत असताना एनआयएने आरोपीला अटक (NIA arrested accused Shamim Ahmed Today) केली होती. शहिम अहमद (Umesh Kolhe murder accused Shahim Ahmed) या आरोपीची आज एनआयए कोठडी संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Shahim Ahmed sent to judicial custody) सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर 10 आरोपी देखील न्यायालयीन कोठडीत आहे. (Umesh Kolhe Murder Amravati)

Umesh Kolhe Murder Amravati
Umesh Kolhe Murder Amravati
author img

By

Published : Oct 7, 2022, 1:32 PM IST

मुंबई : अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याकरिता येत असताना एनआयएने आरोपीला अटक (NIA arrested accused Shamim Ahmed Today) केली होती. शहिम अहमद (Umesh Kolhe murder accused Shahim Ahmed) या आरोपीची आज एनआयए कोठडी संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Shahim Ahmed sent to judicial custody) सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर 10 आरोपी देखील न्यायालयीन कोठडीत आहे. (Umesh Kolhe Murder Amravati)

शमीमच्या अटकेवरील निकाल 10 ऑक्टोबरला - आरोपी शहिम अहमद याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे आरोपीचे वकील अली काशीद खान देशमुख यांनी न्यायालयासमोर अर्जाद्वारे म्हटले होते. या अर्जावर दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद झाल्यानंतर या संदर्भातील निकाल न्यायालय आज देणार होते; मात्र निकाल पूर्ण झाला नसल्याने आता या बेकायदेशीर अटकेवरील निकाल 10 ऑक्टोंबर रोजी देण्यात येणार आहे.

शमीमची अटक बेकायदेशीर ? या प्रकरणात आरोपीच्या वतीने वकील अली काशीफ खान देशमुख यांनी असा एक वाद केला की, आरोपी स्वतःहून न्यायालयासमोर स्वतःला आत्मसमर्पण करण्याकरिता आला होता. मात्र एनआयएने आरोपीला कोर्ट परिसरामध्ये न्यायालयीन कामकाजाचे डॉक्युमेंट तयार करत असताना अटक केली आहे. ही अटक कलम 279 अंतर्गत बेकायदेशीर असल्याचे युक्तिवाद आरोपीच्या वतीने आली काशीफ खान देशमुख यांनी केला होता.

आतापर्यंत सहा जणांना अटक- एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ ​​सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ ​​बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ ​​नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ ​​भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला; मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.