ETV Bharat / city

त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं “हिंमत माझ्या रक्तात आहे- उद्धव ठाकरे - Eknath Shinde live updat

शिवसेना हा एक विचार असून तो विचार संपवणे हेच भाजपचे धोरण आहे हे समजून घ्या. शेरास सव्वाशेर भेटतो. त्यामुळेच भाजपला उत्तर देण्याची जबाबदारी भवानीमातेने शिवसेनेवर टाकली आहे.’’ मला कोणत्याही पदाचा मोह नाही म्हणून मी ‘वर्षां’ निवासस्थान सोडले, पण याचा अर्थ लढाई सोडली असा नव्हे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 25, 2022, 6:48 AM IST

Updated : Jun 25, 2022, 8:06 AM IST

मुंबई- मी माझ्या मानेचं ऑपरेशन केले, तेव्हा मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं “हिंमत माझ्या रक्तात आहे” ! शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधताना शिवसेना पुन्हा बहरेल असा विश्वास दाखविला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या वक्तव्ये ही खूप महत्त्वाची ठरत आहेत.

शिवसेना हा एक विचार असून तो विचार संपवणे हेच भाजपचे धोरण आहे हे समजून घ्या. शेरास सव्वाशेर भेटतो. त्यामुळेच भाजपला उत्तर देण्याची जबाबदारी भवानीमातेने शिवसेनेवर टाकली आहे.’’ मला कोणत्याही पदाचा मोह नाही म्हणून मी ‘वर्षां’ निवासस्थान सोडले, पण याचा अर्थ लढाई सोडली असा नव्हे.

  • मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं “हिंमत माझ्या रक्तात आहे” !

    — Uddhav Thackeray (@uddhavthackeray) June 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जवळचे सोडून गेल्याची खंत- शिवसेना मर्दांची सेना आहे. राजकारणात पुढे जात आहोत. आताचा प्रसंग वेगळा आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात दगा देणारे मला नको, असे म्हटले होते. काहीजण काँग्रेस - राष्ट्रवादी पाठीत खंजीर खुपसणार असे म्हणत होते. पण आज पवार साहेब आणि सोनिया गांधी पाठीशी ठाम उभे आहेत. पण जवळचे सोडून गेल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच येथे उपस्थितांची पात्रता असताना त्यांन जागा दिली. निवडून आणले, पण ते गेले आणि तुम्ही कायम सोबत आहात. तुमच्यामुळे खासदार आहेत, आमदार म्हणून निवडून आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख पद मोकळे करायला तयार -शिवसेनेविषयी एवढे प्रेम आहे. मग गेलात कशाला आहे. मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही. पण माझ्या कुटुंब शिवसेना परिवार, मला आदित्यला तुम्ही नेता मानता. बाळासाहेबांनी सांगितले म्हणून मी वेडा वाकडा वागणार नाही. तुम्हाला जर पक्ष चालवायला नालायक वाटत असेल, तर शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला केलेले आवाहन तुम्ही विसरा. शिवसेना चालवायला मी तुम्हाला योग्य वाटत नसेल तर मला सांगा. मी आता शिवसेना पक्षप्रमुख पद मोकळे करायला तयार आहे. कोणी या शिवसेना पुढे न्या. शिवसेना हा विचार आहे आणि ते संपवायचा भाजप प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आपण निवडणुकीसाठी तयार -देशाचा राजकारणात भाजपचे हिंदुत्व अस्पृश्य होते. तेव्हा शिवसेने त्यांना सोबत घेतले आणि पुढे आपला हात धरून ते आले. तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला हाक दिली. आज आपण फळ भोगत आहोत. खिदळत असलेले फोटो बाहेर येत असतील तर येऊ दे. पुढे हे फुटले तर बाकीचे अडकणार आहेत. भाजप मध्येच जावे लागेल. त्यांचे हे नाटक जास्त वेळ टिकणार नाही. आता आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मागून वार करणारा ही नाही-माझ्या तब्येतीचे कारण सांगून फुटत आहेत. परंतु, जी पदे भोगलीत, जे तुम्हाला स्वातंत्र्य दिले शिवसेनेत हवे सर्व तुम्हाला भाजपमध्ये जाऊन जर तुम्हाला भेटत असेल तर खुशाल जा. तिकडे जाऊन मुख्यमंत्री होत असेल तर बिनधास्त जा, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच तिथे जाऊन उपमुख्यमंत्री व्हायचे असेल तर मला आधीच सांगायचे मी केले असते इथे. मी या सगळ्यामागे आहे सांगतात. मी एवढा षंढ नाही, आणि मागून वार करणारा ही नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही-उद्धव ठाकरे एकटे राहिले पाहिजेत असा भाजपचा डाव आहे. करा मला एकटे तुम्ही निवडून आलेल्याना घेऊन जाऊ शकता, फोडू शकता पण ज्यांनी निवडून दिलेल्या शिवसैनिकांना फोडू शकत नाही. तसेच आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. भाजपने मेहबुबा मुफ्ती सोबत सरकार स्थापन केले. नितीश कुमार सोबत युती केली. त्या नितीश कुमारला विचारा तो हिंदुत्ववादी आहे का, तुम्ही केलं तर चांगलं आणि आम्ही केलं तर शेण खाल्लं असे का, असेही भाजपला सुनावले. लक्षात ठेवा, रक्ताचं पाणी करून शिवसेना पुन्हा वाढवू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांबरोबरील संवादात बोललले महत्त्वाचे मुद्दे

  • 'आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे कसं चालतं ?
  • आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का ?
  • ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही !
  • तुम्हाला जायचंय तर खुशाल जा.. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा !
  • मेलो तरी चालेल पण शिवसेना सोडणार नाही, असं म्हणणारेच पळून गेले..
  • संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र मी त्यांना सांभाळून घेतले !
  • एकनाथ शिंदेंसाठी मी काय नाही केले. नगरविकास मंत्र्यासारखे मोठे खाते दिले. माझ्याकडे असलेली दोन खाती दिली !
  • माझं मुख्यमंत्रीपद मान्य न करणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा !

आगामी निवडणुकीत शिवसेना यश मिळवेल- शिवसेनेतील आमदारांचे बंड हा भाजपचा डाव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांनी ठाकरे आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले. कोणीही उरले नाही तरी शिवसेना पुन्हा उभी राहील आणि आगामी निवडणुकीत यश मिळवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना पुन्हा बहरेल-उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. माझ्याकडे आणि बाळासाहेबांच्या छायाचित्राकडे बघून भावनिक होऊन कोणीही थांबू नका. कोणीही नाही उरले तरी शिवसेना पुन्हा उभी करण्याचा माझा निर्धार आहे. ज्यांना शिवसेना पुन्हा उभी करायची आहे, त्यांनी सोबत राहावे. झाडाची पाने, फुले, फळे गळाली तरी झाडाला पुन्हा बहर येत असतो. कारण त्याची मुळे पक्की असतात. बाळासाहेबांचे शिवसैनिक ही शिवसेनेची मुळे आहेत.

हेही वाचा-Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांचा गट नरहरी झिरवाळांविरोधात दाखल करणार अविश्वास ठराव

हेही वाचा-BMC Shivsena Corporator : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुंबईतील शिवसेना नगरसेवकांमध्ये खळबळ!

हेही वाचा-Sharad Pawar Meet CM : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार उतरले मैदानात; बंददाराआड मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा

Last Updated : Jun 25, 2022, 8:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.