मुंबई- मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. २०१४ ची स्थिती सध्या नाही असे स्पष्ट करत सर्वच्या सर्व २८८ जागांवर लढण्याची तयारी ठेवा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात दिला. एक ना एक दिवस शिवसेनेचाच मुख्यमंत्री करून दाखवणार. तसे वचन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले आहे, याची आठवण त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना करून दिली. शिवसेनेच्या कार्यकर्त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भाजप बरोबर युतीची चर्चा सुरू असून पुढील दोन दिवसा त्याची घोषणा होईल असेही त्यांनी सांगितले. जिंकण्याची क्षमता असलेल्यालाच जागा सोडल्या जातील असेही ते म्हणाले. जागा वाटपाचा जो काही फॉर्म्यूला आहे तो ठरलेला आहे. योग्य वेळी तो सांगितला जाईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेची गेली पाच वर्षे ही संघर्षाची होती. शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त नाही तर चिंता मुक्त करायचे आहे. त्यामुळे सत्ता हवी असल्याचे ठाकरे म्हणाले.सुड उगारलात तर आसूड उगारू असे म्हणत शिवसेना सुडाचे राजकारण करत नसल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. युती तुटणार का तर त्याचं उत्तर नाही असे आहे. युतीची घोषणा आज उद्या होईलच. शाहा फडणवीसांची चर्चा योग्य मार्गाने जात आहे. जिंकण्याची शक्यता कुठे आहे, त्यावर चर्चा सुरू आहे. फॉर्म्यूला ठरला आहे. युती केल्यानंतर पाठीमागून सुरा मारणाऱ्यातले आम्ही नाही, असे सांगत आता २०१४ सारखी स्थिती राहिलेली नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतना गाव तिथे शाखा आणि गाव तिथे शिवसेना पाहिजेच आहे. त्या दृष्टीने कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. सर्व जागांवर तयारी ठेवा. जागा वाटपानंतर बंडखोऱ्या चालणार नसल्याचा सज्जड दम त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कपट कारस्थान, गद्दारी करणार नाही, भगव्याशी इमान राखू, असे वचन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांकडून घेतले आहे.