ETV Bharat / city

उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार, भाजपला टीका करण्यात 'भारतरत्न' द्या - संजय राऊत

उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं, अशी अनेकांची इच्छा आहे. शिवसेना फक्त पक्ष नाही, तर एक कुटुंब आहे आणि बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आजही उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करत आहेत, असे आज आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले.

shivsena leader sanjay raut
संजय राऊत पत्रकार परिषद
author img

By

Published : Dec 22, 2020, 4:49 PM IST

मुंबई - नाशिक व धुळे येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात लोक येण्यास उत्सुक आहेत आणि येत आहेत. त्यामुळे राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवस देशाचे नेतृत्व करतील, असा विश्वास राज्यसभा खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आज धुळे व नाशिक येथील जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यात राज्याचे उद्योग आघाडीप्रमुख समाधान देवरे, मीनानाथ गाडे, भाजप उद्योग आघाडी उपाध्यक्ष, बाळासाहेब गाडे सामाजिक कार्यकर्ता, प्राध्यापक बाळासाहेब शिंदे, अविनाश सोनवणे ज्ञानगंगा क्लासेस संचालक, धुळे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय माने, मनोज मोरे या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याच वेळेला भाजपच्या 50 प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

भविष्यातील घडामोडींच्या भूकंपाचे केंद्र शिवसेना भवन -

बाळासाहेब सानप यांच्या पक्षात प्रवेशाच्या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तीने पक्ष एकत्र लढले तर आम्हाला चांगला स्पेस मिळेल यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, आमचा एकही फुटणार नाही त्यांचं काय काय फुटेल ते भविष्यात पहाल आणि चाचणी म्हणून पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आपण पाहिलय. भाजपची त्या ठिकाणी काय स्थिती होती. भविष्यात हे तीन पक्षांचा सरकार आहे. त्यामुळे एका पक्षातून आता इनकमिंग सुरू होणार आहे. नेते येत-जात असतात, नेते गेले म्हणून काय झाले कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, ते सेनेसाठी पाय घट्ट रोवून उभे राहणार.

नाशिक महापालिकेवर भगवा फडकवा -

नाशिक महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. याठिकाणी शिवसेनेची सानप यांच्या रूपाने देखील मोठी ताकद उभी आहे. पण सानप आता भाजपमध्ये गेल्याने, कार्यकर्ते आता शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे भाजपच्या गडाला खिंडार लावून सेनेचा भगवा पालिकेवर फडकवायचा आहे. नाशिक महापालिकेवर फडकवाच असं संजय राऊत यांनी आज कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशावेळी प्रोत्साहन दिले.

भाजपला टीका करण्यात भारतरत्न द्या -

भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात. टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. "टीका करणाऱ्यांना लोकं मारायची आहेत. तर मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लादण्यात मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, असंही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून विरोधी पक्ष भाजप सरकारवर वेगवेगळ्या टीका करत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, टीका करण्यासंदर्भात भाजपला भारतरत्न मिळायला हवा, लोकांचा जीव जातोय, जगात काय चाललंय त्यांना ठाऊक नाही. संचारबंदी आनंदासाठी नाही. टीका करणाऱ्यांना भारतरत्न आणि डी-लिट ची पदवी द्या, असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला. सरकार हतबल नाही, दिल्लीत सरकार हतबल झालंय, आंदोलन तिथे सुरू आहे, अशी चपराकही संजय राऊत यांनी यावेळी लगावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.