ETV Bharat / city

Uddhav Thackeray शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची साथ, पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी केली घोषणा - Sambhaji Brigade

महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरीचा फटका बसलेल्या शिवसेनेला Shiv Sena आता नवा जोडीदार सापडला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती होणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Party chief Uddhav Thackeray यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड येत्या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचेही ते म्हणाले. संभाजी ब्रिगेड ही मागील 30 वर्षे संविधान, सामाजिक प्रबोधन करणारी संघटना आहे. आता संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायचे आहे, असे अनेकजण मला सांगत होते असे ठाकरे म्हणाले. मला आशा आहे की आपण एकत्र येऊ आणि नवा इतिहास रचू. संभाजी ब्रिगेडची Sambhaji Brigade यापूर्वी भाजपशी युती होती. आता त्यांनी शिवसेनेशी युती केल्याने महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण सुरू होणार आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
author img

By

Published : Aug 26, 2022, 6:13 PM IST

मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरीचा फटका बसलेल्या शिवसेनेला Shiv Sena आता नवा जोडीदार सापडला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती होणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Party chief Uddhav Thackeray यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड येत्या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचेही ते म्हणाले. संभाजी ब्रिगेड ही मागील 30 वर्षे संविधान, सामाजिक प्रबोधन करणारी संघटना आहे. आता संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायचे आहे, असे अनेकजण मला सांगत होते असे ठाकरे म्हणाले. मला आशा आहे की आपण एकत्र येऊ आणि नवा इतिहास रचू. संभाजी ब्रिगेडची Sambhaji Brigade यापूर्वी भाजपशी युती होती. आता त्यांनी शिवसेनेशी युती केल्याने महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण सुरू होणार आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची मैत्री पूर्वीपासून आहे पण आता दोघांची युतीही होत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही त्याचे स्वागत करतो. बंडावर बोलताना ते म्हणाले की, आमचा लढा सुरू आहे, प्रकरण न्यायालयात आहे, जो निर्णय होईल, त्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या विषयावर मी जास्त बोलणार नाही. लोकशाही आणि राज्याच्या अभिमानासाठी ही युती करण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले. संघाचे विचार भाजपला BJP मान्य आहेत का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. मोहन भागवत Mohan Bhagwat यांच्या मताशी भाजप सहमत आहे का, असा प्रश्नही त्यांना पडला पाहिजे.

शिंदे विरुद्ध ठाकरे संभाजी ब्रिगेडशी हातमिळवणी करून आगामी निवडणुकीत भाजप प्रादेशिक अस्मिता आणि लोकशाहीला मोठा धोका असल्याच्या मुद्द्याचे उद्धव ठाकरे कितपत भांडवल करतात, हे पाहाण आता महत्वाचं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हिंदुत्वाचा मार्ग सोडला होता. असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करण्यात शिंदे गट कितपत यशस्वी होतो, हेही पाहावे लागेल.

सेनेतील बंड शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde म्हणून शपथ घेतली. सध्या त्यांना शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शिंदे गटाला 50 आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे आपल्या भाषणात सभांमध्ये बंडखोरी केली नसल्याचे नेहमीच सांगतात. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर काम करत असून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत असे मुख्यमंत्री करण्याची नेहमीच सांगत असतात.

एकमेकांवर आरोप दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा बंडखोर गट तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व त्यांचे नेते हे एकमेकांवर आरोप करत आहेत व जनतेला भावनिक आवाहन करत आहेत. अशात जनता नेमकी कोणाच्या बाजूने उभे राहते हे येत्या निवडणुकीतच स्पष्ट होईल.

हेही वाचा Sonali Phogat Case सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवा खुलासा, दोन सहकऱ्यांनी बळजबरीने पाजले विषारी ड्रिंक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.