ETV Bharat / city

राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा होणार ऑनलाईन - उदय सामंत

author img

By

Published : Apr 22, 2021, 7:36 PM IST

राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. याबाबत माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुंबई
मुंबई

मुंबई - वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील १३ विद्यापीठाच्या कुलगुरूंशी परीक्षांबाबत बैठक घेतली. या बैठीकीत ऑफलाईन परीक्षा रद्द करून विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य शासनाकडून राज्यात कडक निर्बध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचे नियोजन देखील विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या उर्वरित सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी 'उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत कोविड १९ संसर्ग काळात अंतिम वर्षाच्या आणि अन्य परीक्षांचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर उदय सामंत यांनी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षांपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही -

ऑनलाईन परीक्षा संदर्भातील विद्यार्थांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तेराही विद्यापीठाच्या कुलगुरूंना सूचना दिल्या आहेत. विद्यार्थांचे नुकसान होणार नाही यांची काळजी विद्यापीठ आणि महाविद्यालय घेतली अशी विनंती सुद्धा करण्यात आली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठे घेणार आहेत. यासंबंधित सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

शुक्रवारपासून ऑनलाईन परीक्षा -

राज्य सरकारने घातलेल्या कडक नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थी घराबाहेर पडू शकणार नाही. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय की महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. यांची अंलबजावणी शुक्रवारपासून करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागावा याकरिता विद्यापीठातील कुलुकरूंनी उच्च शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि प्राध्यापकांना अत्यावश्यक सेवामध्ये समावेश करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून विद्यापीठया परीक्षेचा निकाल वेळेवर जाहीर करता येईल. यासंबंधित मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी भेटून शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि प्राध्यापकांना अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्याची विनंती करेन अशी माहिती 'उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.