मुंबई - मुंबईतील बदललेल्या प्रभाग रचनेवरून आरोप प्रत्यारोप ( Uday Samant comment on ward structure change ) सुरू झाले आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा काढल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे ( ward structure change eknath shinde ) यांचा विरोध झुगारून प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय ( Uday samant on ward structure mumbai ) घेण्यात आला, असा दावा करत तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे यावेळी बोट दाखवले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे, शिवसेना आणि शिंदे गट प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने - सामने येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Salim Fruit : छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला 'या' तारखेपर्यंत एनआयए कोठडी
शिंदेंचा विरोध डावलून निर्णय - ऑक्टोबरमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना ( ward structure change in mumbai ) घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या निर्णयाला तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध केला होता. तसेच, प्रभाग रचना तीन ऐवजी चार का करू नये, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, प्रभाग रचनेत पारदर्शकता यावी अशी भूमिका शिंदे यांनी मांडली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारला बदललेल्या प्रभाग रचनेचा फायदा होईल, असे सांगत बहुमताने निर्णय घेण्यात आला. कोणताही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर तो मुख्य सचिवामार्फत संबंधित मंत्र्यांकडे पाठवला जातो. त्यानुसार तो तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आला होता. त्यामुळे, नगर विकास मंत्र्याने घेतलेला निर्णय आज मुख्यमंत्री झाल्यावर बदलला, असा काही जो गैरसमज पसरवला जात आहे तो चुकीचा असल्याचे उदय सामंत म्हणाले.
राणेंवर केसरकरांचे आरोप - सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत भाष्य करताना सामंत म्हणाले, आजही आम्ही त्यांचा आदर करतो. ती आमची संस्कृती आहे. दीपक केसरकर यांनी आपल्या बोलण्यातून आदित्य ठाकरे यांच्या बद्दलचा आदर आणि सुसंस्कृतपणा दाखवला आहे. मारहाण, धमकी देऊन राजकीय संस्कृती टिकवता येत नाही, असा चिमटा शिवसेनेला काढला. दरम्यान, येत्या 15 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊन शपथविधी होईल आणि सर्व मंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजवंदन करताना दिसतील असेही सावंत म्हणाले.
निष्ठेवर सारवासारव - उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे गटातील आमदार खासदारांच्या जाहिराती नाकारण्यात आल्या. परंतु, आज जितेंद्र आव्हाड यांची निष्ठा अशा आशयाची जाहिरात मुख्य पानावर देण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांची जाहिरात अडचणीची वाटली असेल तर जितेंद्र आव्हाड यांची जाहिरात संघटना वाढीसाठी महत्त्वाची असेल, असे सांगत निष्ठेवर सारवासारव केली. तसेच, ठाकरे कुटुंबातून राजकारणात येणाऱ्या तिसऱ्या पिढीला शुभेच्छा दिल्या.
बंडखोर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाला धमकी दिली होती. शिंदे गटाच्या आमदारांना धमक्या येत आहेत. मलाही पुण्यात हल्ला झाल्यानंतर धमकी आली होती. या धमक्या कोण देतोय, हे आम्हाला माहित आहे. मात्र, आम्ही अशा फुटकळ लोकांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडेही आक्रमक कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विकास काम करणार आहोत, असे सामंत म्हणाले.