मुंबई - समुद्र किनारी जात असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. माहीम कॉजवे खाडीत ( Mitthi river at Mahim Koswe ) मध्यरात्री एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यूदेह सापडला आहे. पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाकडून दुसऱ्या तरुणाला शोधण्यासाठी मोहिम सुरू आहे. जावेद शेख आणि असिफ अशी या तरुणांची नावे आहेत
बांद्रा एस व्ही रोड आणि सी लिंक जंक्शन येथील खाडीत गुरुवारी (११ ऑगस्ट) रात्री ११.३४ च्या सुमारास २ तरुण बुडाले. तरुण बुडाल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाकडून शोध मोहीम राबवली जात आहे. मात्र अद्याप या तरुणांचा शोध लागला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. कुर्ला येथील हे तरुण असून घरी जाताना अंधारात पाय घसरून ते खाडीत पडल्याची माहिती मिळत आहे.
शोधकार्य सुरू- कुर्ला येथील काही तरुण माहीम दर्गा ( Mahim Darga drown case ) येथे रात्री दर्शनासाठी आले होते. रात्री उशिरा निघाले घरी असता नैसर्गिक विधीसाठी माहीम कॉजवे जवळच्या मिठी नदी येथे गेले. दरम्यान, एकाचा तोल गेल्याने तो मिठीत नदीच्या पात्रात पडले. त्याच्या मदतीसाठी आलेला दुसरा तरुणही खाली ( Two youths drown in Mitthi river ) पडला. या घटनेची माहिती तात्काळ मुंबई पोलीस आणि अग्निशामक दलाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले.
दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू नदी पत्रातील गाळ आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे मदतकार्यात अडथळा आला. पहाटेपासून अग्निशमन दलाने युद्धपातळीवर शोधकार्य करत एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.