मुंबई - एका बियर बारच्या कॅशियर व दोन वेटरना ग्राहकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे.
मुंबईतील मालाड पोलिसांनी तीन बियर बार मधील एका कॅशियर सोबतच 2 वेटर यांना सुद्धा अटक केले आहे. त्यांच्याकडून तीन क्लोनिंग मशीन सोबतच लॅपटॉप, एटीएम कार्ड आणि ग्राहकांचे एटीएम पिन नंबर लिहिलेले कागद सुद्धा हस्तगत करण्यात आले आहेत.
तक्रारकर्त्याने सांगितले की, त्याच्याकडून न वापरताही खात्यातून पैसे कट होत आहेत. बोरिवली पूर्व येथील 24 वर्षीय धर्मेंद्र कुमार सिंह याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.