मुंबई - कुर्ला येथील काही जण भिवंडी येथील धाब्यावर जेवणासाठी जात होते. मात्र जेवणासाठी जाण्याआधीच विक्रोळी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ( Accident due to loss of driver control ) कार गाडी सर्विस रोडवरील झाडावर जाऊन आदळली. यात २ जणांचा मृत्यू झाला ( Car accident kills 2 youths ) असून इतर ७ जण जखमी झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून ( Mumbai Police ) देण्यात आली आहे.
असा झाला अपघात - मिळालेल्या माहितीनुसार कुर्ला कुरेशी नगर मधील राहणारे ९ तरुण इनोव्हा गाडीने भिवंडी येथील ढाब्यावर जेवणासाठी निघाले होते. गाडी भिवंडीच्या दिशेने निघाली असताना विक्रोळी येथे आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी सर्विस रोडवरील झाडावर जाऊन आदळली. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षातर्फे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनाग्रस्त कारमधील ९ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी २ जणांचा मृत्यू ( Two people were killed ) झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
२ जणांचा मृत्यू, ७ जखमी - या अपघातात शाहिद सलिम कुरेशी वय १८, आणि जुनेद सलीम कुरेशी वय २६ या दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे. आमान अब्दुल गफार कुरेशी-१९, साजिद अनिस अहेमद अन्सारी-१५, शाहिद मो. सलीम कुरेशी-१८, आयान कुरेशी-१८, कैफ शरीफ कुरेशी-१७, शाहिद अहमद अनीस अन्सारी-१७, अलीम जाकीर कुरेशी-२१ हे ७ जण जखमी झाले आहेत.