मुंबई - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनामुळे सण साजरे करण्यावर बंदी होती. यंदा सण साजरा करण्यास परवानगी देण्यात आली होती. काल रंगामुळे दोन जणांच्या डोळ्याला किरकोळ इजा ( Two people eyes hurt due to holi colours ) झाल्याचे जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, रस्ते अपघातात किरकोळ ३० ते ४० जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा - Shab-E-Barat : मरीन लाइन्समधील बडा कब्रस्तान येथे शब-ए-बारात
दोन वर्षांनी होळी, धुळीवंदन -
मुंबईत मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने सर्वच सणांवर निर्बंध आले. कोरोनाचे नियम पाळत मुंबईकरांना सण साजरे करावे लागले. गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या तीन लाटा येऊन गेल्या. या तीनही लाटांवर राज्य सरकार, महापालिका आणि मुंबईकरांनी मात केली आहे. यामुळे यंदा होळी आणि धुळीवंदन सण साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती.
किरकोळ जखमी -
राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनंतर, काल मुंबईत धुळीवंदन सण साजरा करण्यात आला. लहान मुले, तरुण, वयोवृद्ध सर्वच रंगांमध्ये रंगले होते. अनेकांनी कोरोनामुळे रंगपंचमी घरात आणि आपल्या वसाहतीत खेळली. यामुळे याआधीप्रमाणे रंगाच्या बाधा झाल्याचे प्रकार समोर आलेले नाहीत. मात्र, दोन जणांच्या डोळ्याला किरकोळ इजा झाल्याचे जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, रस्ते अपघातात ३० ते ४० जण किरकोळ जखमी झालेले उपचारासाठी दाखल झाल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
हेही वाचा - कोविड काळात राज्यात ८ हजार ५८४ बालमृत्यू-आरोग्य मंत्र्यांची माहिती