ETV Bharat / city

वर्सोवा समुद्रात बुडालेल्या ५ पैकी २ मुलांचा मृत्यू, एकजण अद्यापही बेपत्ता

गणेश विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रात 5 मुले बुडाली होती. यापैकी 2 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

वर्सोवा समुद्रात बुडालेल्या ५ पैकी २ मुलांचा मृत्यू, एकजण अद्यापही बेपत्ता
वर्सोवा समुद्रात बुडालेल्या ५ पैकी २ मुलांचा मृत्यू, एकजण अद्यापही बेपत्ता
author img

By

Published : Sep 21, 2021, 1:02 AM IST

मुंबई - एकीकडे गणेश विसर्जन सुरू असताना अनंत चतुर्दशी दिनी रात्री ९ च्या सुमारास ५ मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी २ जणांना वाचवण्यात यश आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ मुलगा अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

5 मुले बुडाली -

मुंबईत गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना रविवारी रात्री ९ च्या सुमारास विसर्जनदरम्यान ५ मुले वर्सोवा जेट्टी येथे गेली होती. समुद्रात ही पाचही मुले बुडाली. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व गावकऱ्यांनी शोध घेतला असता शिवम रंजनलाल निर्मळ (१९) आणि विजय रोहिदास मराठे (१८) या २ जणांना शोधण्यात यश आले आहे. शिवम याच्यावर एचबीटी रुग्णालयात तर विजय याच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, नेव्हीचे डायव्हर्स, लाईफ गार्ड यांनी शोध मोहीम राबवली. समुद्रात ज्या ठिकाणी मुले बुडाली त्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात फेरी बोट वापरून शोधकार्य सुरू केले. मात्र त्या ३ मुलांचा शोध सोमवारी पहाटे पर्यंत लागला नव्हता.

२ मुलांचा मृत्यू, १ अद्दापही बेपता -

सोमवारी २० सप्टेंबर रोजी शोध मोहीम सुरू असताना दोन मुलांचा शोध लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. शुभम रंजनलाल निर्मळ (१८) व संजय हिरामन तावडे (२०) अशी या मृत मुलांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.