ETV Bharat / city

मुंबईच्या प्रभादेवी भागातील 'ओंकार' इमारतीचे दोन मजले कोसळले - प्रभादेवी मुंबई बातमी

मुंबईत गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे प्रभादेवी येथील ओंकार या इमारतीचे दोन मजले कोसळले आहेत.

omkar building collapse in mumbai
मुंबईतील प्रभादेवी भागातील 'ओंकार' इमारतीचे दोन मजले कोसळले
author img

By

Published : Aug 6, 2020, 3:07 PM IST

मुंबई - प्रभादेवी येथील साई भक्ती मार्गावर असलेल्या ओंकार इमारतीचे दोन मजले कोसळले आहेत. आज (गुरुवार) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईतील प्रभादेवी भागातील 'ओंकार' इमारतीचे दोन मजले कोसळले

जयप्रभा आणि ओंकार या दोन इमारती तळमजल्यासह तीन मजली इमारती एकमेकांना लागून आहेत. या दोन्ही इमारती जुन्या आहेत. गेले 2 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओंकार इमारतीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला. यावेळी घरात लोक राहत होते. घटना घडताच रहिवाशांनी इमारती खाली धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि महानगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा - मुंबई पूर्वपदावर यायला सुरुवात, कुलाब्यात 300 मिमी पावसाची नोंद

दोन्ही इमारतींचा पुनर्वसनाचा वाद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पुढील धोका पाहता महापालिकेने इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.