ETV Bharat / city

पंढरीची वारी ही स्त्री पुरुष समानतेचे प्रतिक - नरेंद्र मोदी, पालखी महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गासाठी सुमारे 12 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा कराव्यात, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाला दिल्या. दरम्यान, राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत भाषण करताना, संताच्या अभंगाचे मराठीतून दाखले देत, वारकऱ्यांची मने जिंकली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Nov 8, 2021, 7:42 PM IST

Updated : Nov 8, 2021, 7:55 PM IST

मुंबई/सोलापूर - केंद्र शासनाकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर महामार्गाची निर्मिती केली जात आहे. प्रत्येक गाव व खेडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने दक्षिणेची काशी, अशी ओळख असणाऱ्या पंढरीलाही पालखी महामार्गाने जोडले जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल. या रस्त्यामुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच या भागाच्या विकासाला अधिक चालना मिळेल. तसेच येथे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले जाऊन रोजगार निर्मितीही होणार आहे. त्यामुळे हे मार्ग म्हणजे विकासाचा नवा प्रवाह असून पंढरीची वारी ही स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक आहे, असे प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले.

बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे भूमीपूजन, लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यावेळी बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

तर व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमानी, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सोयी करण्याच्या दिल्या सूचना

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गासाठी सुमारे 12 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सावली देणारे वृक्ष लावणे, पालखी मार्गावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे व भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र झाले पाहिजे, अशा सूचना मोदींनी राज्य सरकारला यांनी दिल्या. दरम्यान, राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत भाषण करताना, संताच्या अभंगाचे मराठीतून दाखले देत, वारकऱ्यांची मने जिंकली.

जगाला समानतेचा संदेश

पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी महामार्गसाठी लांबी अनुक्रमे 231 व 130 किलोमीटर असणार आहे. 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. या पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशी ही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार आहे. मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरची वारी जगातील सर्वात प्राचीन वारी असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामी, नैसर्गिक आपत्तीमध्येही वारी सुरूच असून या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव व द्वेष केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे, पंतप्रधान यांनी सांगितले.

कमतरता राहू देणार नाही - मुख्यमंत्री

पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वाखरी येथे वारकऱ्याकडून रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हेही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, असे ते म्हणाले. पालखी महामार्ग तसेच महाराष्ट्रातून जाणारे रस्ते निर्मितीत महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक पाऊल केंद्रासोबत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूरकडे म्हणजेच भक्तिमार्गाकडे जाणारे रस्ते चांगलेच असले पाहिजेत. हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विठू माऊलीचा आशीर्वाद असेल, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. प्राचीन काळापासून वारकरी संप्रदायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारीची परंपरा जपलेली आहे. त्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात राज्य शासनाचा ही पुढाकार असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांस्कृतिक ठेवा जपणार - गडकरी

पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्र संतांची भूमी आहे. पंढरपूर हे विशेष प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. पालखी महामार्गच्या माध्यमातून येथील सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण केले जात असून यामध्ये भारत माता योजना, राम गमन मार्ग, राम जानकी मार्ग, बुद्धिष्ट सर्कल, मानस सरोवर मार्ग निर्माण केले जात आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग हा 231 किलोमीटरचा आहे. सात हजार कोटींची तरतूद यासाठी केली असून हा एकूण पाच पॅकेजमध्ये केला जात आहे. त्यातील चार पॅकेजचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री गडकरी यांनी दिली. तर संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी 130 किलोमीटर असून यासाठी पाच हजार कोटीची तरतूद केलेली असून या कामास सुरुवात झालेली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. राज्य शासन 1 हजार 438 कोटी रुपये या महामार्गासाठी देणार असून या महामार्गावरून वारकऱ्यांना सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. वाखरी ते पंढरपूर रस्ता पालखी महामार्गात पूर्वी समाविष्ट केलेला नव्हता. पण, हा साधारण पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी 74 कोटीचा निधी मंजूर केल्याचे गडकरी म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 13 महामार्ग प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे कळ दाबून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाच्या प्रकृतीची पाहणी करून याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर या महामार्गाच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा यांच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे प्रमुख योगेश देसाई व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे प्रमुख मोरे यांचा सत्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

हे ही वाचा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतले विठुरायाचे मुख दर्शन

Last Updated : Nov 8, 2021, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.