ETV Bharat / city

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आठवा स्मृतिदिन

Balasaheb Thackeray Death Anniversary
बाळासाहेब ठाकरेंचा आज आठवा स्मृतीदिन..
author img

By

Published : Nov 17, 2020, 8:09 AM IST

Updated : Nov 17, 2020, 4:09 PM IST

13:47 November 17

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली..

आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.. अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

13:46 November 17

प्रवीण दरेकरांनी वाहिली श्रद्धांजली, दिला जुन्या आठवणींना उजाळा..

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला.

13:43 November 17

बाळासाहेब आमच्यातून गेले असले, तरी त्यांचे आशीर्वाद आमच्यावर कायम - अनिल परब

परिवाहन मंत्री अनिल परब यांनी शक्तीस्थळाला भेट देत, बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब आमच्यातून गेले असले, तरी त्यांचे आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत. बाळासाहेबांनी आशीर्वाद दिल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. बाळासाहेब हे सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर आम्ही पुढे चालत आहोत, असे ते यावेळी म्हणाले.

11:12 November 17

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शक्तीस्थळावर दाखल; सहकुटुंब वाहिली श्रद्धांजली..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब शक्तीस्थळावर जात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली.

11:10 November 17

शिवसैनिक मुख्यमंत्री होण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - छगन भुजबळ

महाराष्ट्राचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले असून, "शिवसैनिक मुख्यमंत्री होण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले" अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

10:18 November 17

शक्तीस्थळावरील परिस्थितीचा आढावा..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आठवा स्मृतिदिन; शक्तीस्थळावरुन LIVE अपडेट्स..

08:53 November 17

११.३० वाजता मुख्यमंत्री देणार भेट..

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान सहकुटुंब दादरच्या शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर येणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

08:05 November 17

शक्तीस्थळावर शिवसैनिक येण्यास सुरुवात..

बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कमधील शक्तीस्थळावर येण्यास सुरुवात झाली आहे.. तसेच स्वतः खबरदारी म्हणून शिवसैनिक एकमेकांना मास्क वाटत आहेत.

07:59 November 17

महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली शक्तिस्थळाला भेट; वाहिली श्रद्धांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन आज आहे. यानिमित्त कोरोनारुपी संकट मुंबई, महाराष्ट्र देशातून साता समुद्रापार जाऊ दे, मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहू दे, अशी प्रार्थना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलीय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शक्तीस्थळावर जावून त्यांनी आज श्रद्धांजली वाहिली.

07:28 November 17

बाळासाहेब ठाकरेंचा आज आठवा स्मृतिदिन..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज आठवा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने आज शक्तीस्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

Last Updated : Nov 17, 2020, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.