ETV Bharat / city

आधारविना भटके-विमुक्त लसीकरणापासून वंचित राहणार? मुनींप्रमाणे अटी शिथील होणार? - ओळखपत्र लसीकरण भटके विमुक्त

ज्यांची कोविन एपवर नोंदणी होत नाही अशा लाभार्थ्यांची नोंदणी लसीकरण केंद्रावर होते. यासाठी आधार कार्डची विचारणा केली जाते. मात्र ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत अशा लाभार्थ्यांचे काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

भटके विमुक्त लसीकरण मागणी जानकर
tribal vaccination demand mahadev jankar
author img

By

Published : May 4, 2021, 12:07 PM IST

Updated : May 4, 2021, 7:59 PM IST

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज आहे, मात्र लसीचा तुटवडा आहे. सरकारकडून लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी नोंदणीकरता कोविन अ‌ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यांची कोविन अ‌ॅपवर नोंदणी होत नाही अशा लाभार्थ्यांची नोंदणी लसीकरण केंद्रावर होते. यासाठी आधार कार्डची विचारणा केली जाते. मात्र, ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत अशा लाभार्थ्यांचे काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

बोलताना सुनिता चव्हाण, मंदा चव्हाण आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर

हेही वाचा - 'प्रकाश जावडेकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी'

आधार नसल्याने लसीकरण कसे होणार?

राज्यासह संपूर्ण देशात भटक्या विमुक्त समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सूर्य उगवला की मोकळ्या आकाशाच्या छताखाली रोजच्या दिवसाची सुरुवात करायची. दिवस माथ्यावर आला की झाडांची सावली पाहून निजायचे. आपल्या चिल्यापिल्यांना सोबत घेवून संसार करायचा. या परिस्थितीशी झगडताना कोरोनासारखे संकट येते. या संकटावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे, मात्र लसीकरणाला आधार कार्डची गरज आहे. पण, आधार कार्ड नसल्याने लसीकरण कसे होईल? हा प्रश्न अशा समाजातील नागरिकांसमोर समोर उभा आहे.

रासपचे महादेव जानकर यांनी केली मागणी

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी देखील या प्रसंगी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे मागणी करत भटक्या समाजातील बहुसंख्य लोकांसाठी या अडचणीच्या काळात ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच, दुर्लक्षित घटकांचेही लसीकरण होणे गरजेचे असल्याचे महादेव जानकर म्हणाले.

भटक्या-विमुक्तांचेही लसीकरण व्हावे

या काळात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. यामुळे रस्त्यावर चिटपाखरू नाही. रस्त्यावर कोणी दिसले तर पोलीस त्यांना घरी जाण्याच्या सूचना करत आहेत. मात्र, ज्यांचे घरचं फुटपाथ आहे, त्यांनी काय करावे? कुठे जावे आणि कुणाला सांगावे? आज ना उद्या कोरोना नष्ट होईल. पुन्हा थांबलेली शहरे धावायला लागतील. या शहरांच्या गतीत आपले भटके विमुक्त बांधव मागे राहू नये आणि यांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे ही अपेक्षा.

जैन मुनींना आधाराशिवाय लसीकरणाची मुभा

जैन मुनी, सर्वधर्मीय साधुसंत ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि लसीकरणासाठी लागणारी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांचे लसीकरण कसे होणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे, कागदपत्रे नसले तरी त्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महापालिका आयुक्त यांना केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती सावंत यांनी दिली. महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवसेनेच्या या प्रयत्नांबद्दल जैन बांधवांकडून शिवसेनेचे आभार व्यक्त होत आहेत.

भाजपनेही केली होती मागणी

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना पॅन कार्ड अथवा आधारकार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. मात्र, साधू हे सर्वत्र फिरत असतात व त्यांचा कायमचा पत्ता नसतो. त्यामुळे, त्यांच्याकडे आधारकार्ड नसते. त्यामुळे त्यांना ओळखपत्राशिवाय लस देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली होती. गुजरातने नोंदणीकृत धर्मादाय संस्था, मंदिर तसेच वयाबाबत डॉक्टरने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य मानून लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्याच आधारावर मुंबईतही अशा प्रकारे लसीकरण करण्यात यावे, असे शिरसाट यांनी सांगितले.

साधुसंतांप्रमाणे भटक्या-विमुक्तांनाही ओळखपत्राशिवाय लसीकरणाची मुभा द्यावी

साधू-संतांना ज्या प्रमाणे ओळखपत्राशिवाय लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांनाही ओळखपत्राचे बंधन शिथील करून लसीकरण मोहिमेत त्यांना सहभागी करून घेतले जाईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - मुंबईकरांना मोफत आणि त्वरित लस द्या; भाजपा नगरसेवकांची महापौर दालनाबाहेर निदर्शने

Last Updated : May 4, 2021, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.