ETV Bharat / city

मेट्रो 2 अ आणि 7च्या ट्रायल रन मे अखेरीस - मेट्रो 2 अ आणि 7 च्या ट्रायल रन बद्दल बातमी

मेट्रो 2 अ आणि 7 च्या ट्रायल रन मे अखेरीस होणार आहेत.याबाबत माहिती बी जी पवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

trial run of Metro 2A and 7 will take place at the end of May
मेट्रो 2 अ आणि 7 च्या ट्रायल रन मे अखेरीस
author img

By

Published : May 14, 2021, 3:51 PM IST

मुंबई - महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो 2 अ (दहिसर ते डीएन नगर)आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) च्या ट्रायल रनला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कोरोना-लॉकडाऊन आणि इतर अडचणींचा मोठा फटका या प्रकल्पाला बसला आहे. परिणामी ट्रायल रनला चार महिने उशीर झाला असून प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा मुहूर्तही पुढे गेला आहे. मात्र, आता मे अखेरीस म्हणजेच येत्या 15 दिवसांत या दोन्ही मार्गावर ट्रायल रन घेण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त बी जी पवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

15 जानेवारीला होणार होती चाचणी -

मेट्रो 2 अ या 18.589 किमीच्या आणि मेट्रो 7 या16.475 किमीच्या मेट्रो मार्गचे काम डिसेंबर 2020मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कोरोना, लॉकडाऊनचा मोठा फटका मागील वर्षी या प्रकल्पाच्या कामाला बसला. त्यामुळे डिसेंबर 2020ची डेडलाईन चुकली. लॉकडाऊनमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने काम संथगतीने सुरू राहिले. मात्र, दिवाळीनंतर कामाने चांगला वेग घेतला आहे. त्यामुळे एमएमआरडीएने 15 जानेवारी 2021मध्ये ट्रायल रन घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र, या दोन्ही मार्गावर ज्या स्वदेशी बनावटीच्या मेट्रो धावणार आहेत. त्या बंगळुरूमध्ये तयार होत असून यातील पहिली गाडी येण्यास विलंब झाल्याने ट्रायल रन रखडली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिली गाडी मुंबईत दाखल झाली. इतर कामे बाकी असल्याने मार्चमध्ये ट्रायल रन घेत 1 मे रोजी दोन्ही मार्ग सेवेत दाखल करू असे एमएमआरडीएने सांगितले. मुंबईत पुन्हा कोरोनाचा कहर वाढला. लॉकडाऊन लागले. मजूर कमी झाले. परिणामी पुन्हा काम मंदावले आणि मार्चचाही मुहूर्त चुकला.

आता डिसेंबर 2021 मध्ये मेट्रो धवणार?

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतुन सुटका करणारे आणि त्यांचा प्रवास सुकर करणारे असे हे दोन्ही मेट्रो मार्ग आहेत. त्यामुळे हे मार्ग कधी सेवेत दाखल होतात याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मात्र, दोन वेळा या प्रकल्पाची डेडलाईन चुकली असून मुंबईकरांची प्रतीक्षा वाढतच चालली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचाच मोठा फटका या प्रकल्पाला बसला आहे. आता मात्र हे काम वेगाने पूर्ण करत डिसेंबर 2021मध्ये दोन्ही मार्ग वाहतूक सेवेत दाखल करू असे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने येत्या 15 दिवसात या दोन्ही मार्गावर ट्रायल रन घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. 520 मीटरची मिनी ट्रायल रन फेब्रुवारीमध्ये यशस्वीपणे पार पडली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.