ETV Bharat / city

सायनमध्ये बिल्डरकडून झाडांची कत्तल; नगरसेविकेला नोटीस, काँग्रेसकडून कारवाईची मागणीी - पालिका वृक्ष प्राधिकरण

एका बिल्डरला पालिका वृक्ष प्राधिकरणाने विकास कामांसाठी २२ झाडे कापण्यास परवानगी दिलेली असताना त्याने तेथील सर्वच म्हणजे ६९ झाडांची कत्तल केली आहे. या वृक्ष कत्तलीला अप्रत्यक्षपणे आयुक्त, वृक्ष प्राधिकरण समिती यांना जबाबदार ठरवत बिल्डरवर कडक कारवाईची मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

बिल्डरकडून झाडांची कत्तल
बिल्डरकडून झाडांची कत्तल
author img

By

Published : Dec 31, 2021, 6:57 AM IST

मुंबई - सायन कोळीवाडा येथील एका बिल्डरला पालिका वृक्ष प्राधिकरणाने विकास कामांसाठी २२ झाडे कापण्यास परवानगी दिलेली असताना त्याने तेथील सर्वच म्हणजे ६९ झाडांची कत्तल केली आहे. या वृक्ष कत्तलीला अप्रत्यक्षपणे आयुक्त, वृक्ष प्राधिकरण समिती यांना जबाबदार ठरवत बिल्डरवर कडक कारवाईची मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी वृक्ष प्राधिकरण समितीत विरोध न करणाऱ्या काँग्रेस नगरसेविकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.

भर दिवसा कत्तल -

सायन कोळीवाडा परिसरातील सरदार नगर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या तीन इमारती धोकादायक ठरल्यामुळे त्यांचा बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात येणार आहे. मात्र सदर जागेवरील काही झाडे बांधकामाच्या आड येत असल्याने बिल्डरने तेथील ६९ झाडांपैकी २२ झाडे कापण्यासाठी, ३६ झाडे आहे तशी जागेवरच ठेवण्यासाठी आणि उर्वरित ११ पुनर्रोपित करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी मागितली होती. पालिका वृक्ष प्राधिकरण समितीने ३ ते ४ महिन्यांपूर्वीच बिल्डरला झाडे तोडण्याची परवानगी दिली. मात्र बिल्डरने सर्व ६९ झाडांची भर दिवसा कत्तल करून टाकली, असा आरोप रवी राजा यांनी केला.

बिल्डर, अधिकारी यांचे संगनमत -

झाडांच्या कत्तलीला पालिका अधिकारी व बिल्डर यांचे संगनमत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. या प्रकरणी आपण स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषी बिल्डर व संबंधीत पालिका अधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रवी राजा यांनी केली आहे.

काँग्रेस नगरसेविकेला पक्षाकडून नोटीस -

या प्रकरणी विरोध दर्शवण्याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीवरील कॉंग्रेस सदस्य नगरसेविका सुषमा राय यांना लिखित पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र त्यांनी सदर प्रस्तावाला विरोध न करता त्या संबंधित विझिट अहवालावर स्वाक्षरी केली. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडे याप्रकरणी खुलासा मागण्यात आला आहे, असे रवी राजा यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.