विरार ( मुंबई ) - नालासोपाऱ्याच्या संतोष भुवन परिसरातील एका दवाखान्यात डॉक्टर ऐवजी कम्पाउंडरकडून ( Treatment on doctor by compounder ) रुग्णांवर उपचार करण्यात येतात. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कम्पाउंडर रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतोष भुवन परिसरातील चाळ वस्तीत राकेश कुमार सिंह ( Dr Rakesh Kumar Singh clinic ) नावाच्या डॉक्टरचा दवाखाना ( fraud doctor in Santosh Bhuvan Nalasopara ) आहे. मात्र, या दवाखान्यात डॉक्टरांऐवजी तेथील कंपाउंडर रुग्णांची तपासणी करत होता. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात राहणारी महिला दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. कम्पाउंडरने महिलेला तपासून औषधे लिहून दिली होती. मात्र, या औषधांचा दुष्परिणाम झाल्यानंतर महिलेला संशय आला. तिने दवाखाना गाठल्यानंतर या सर्व प्रकारचा भांडाफोड झाला. याबाबत कंपाउडरला विचारणा केली असता त्याने महिलेला तपासल्याची कबुली दिली.
हेही वाचा-Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, आता येणार 5G सुविधा
हलगर्जीपणा दाखवणाऱ्या डॉक्टरवर कारवाई
डॉक्टर रुग्णालयात ड्युटीला असल्याचे तिने सांगितले. कंपाउंडरने तपासणी करताना अश्लील वर्तन केल्याचा पीडित महिलेने आरोप केला आहे. सध्या बोगस डॉक्टरांवर कारवाईचे सत्र वसई विरारमध्ये सुरू ( Bogus doctors in Virar ) आहे. त्यामुळे डॉक्टरच्या नावाने दवाखाना चालवित असलेल्या कंपाउंडरवर तसेच रुग्णांच्या जीवाबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या डॉक्टरवर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.